थंडीमुळे चेहऱ्यावर काळेपणा वाढला आहे? रात्री झोपताना लावा 'ही' नॅचरल नाईट क्रीम
देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. थंड वातावरणात बाहेर जाणे सुद्धा खूप जास्त कठीण वाटते. वाढत्या थंडीचा परिणाम जसा आरोग्यावर दिसून येतो तसाच परिणाम त्वचा आणि केसांवर सुद्धा होतो. त्वचा अतिशय कोरडी आणि निस्तेज होऊन डेड स्किन वाढू लागते. चेहऱ्यावर वाढलेल्या कोरडेपणा त्वचेचे सौंदर्य पूर्णपणे खराब होऊन जाते. त्यामुळे थंडीत भरपूर पाणी पिण्यासोबतच त्वचेची काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. या दिवसांमध्ये शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते, ज्याच्या परिणामामुळे चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीराच्या त्वचेवर कोरडेपणा जाणवू लागतो. अशावेळी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअरचा वापर करतात. यामुळे लवकर कोणताही परिणाम दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील कोरडेपणा आणि डेड स्किन कमी करण्यासाठी नॅचरल क्रीम बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा पदार्थ त्वचा चमकदार करण्यास मदत करेल. (फोटो सौजन्य – istock)
नाईट क्रीम बनवण्यासाठी वाटीमध्ये एक चमचा कोरफड जेल, ग्लिसरिन, गुलाब पाणी आणि नारळाच्या तेलाचे ५ थेंब टाकून मिश्रण तयार करा. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर क्रीम तयार होईल. तयार केलेली क्रीम काचेच्या छोट्या डब्यात भरून ठेवावी. रात्री झोपण्याआधी नियमित नाईट क्रीम लावल्यास त्वचा खूप जास्त हायड्रेट आणि चमकदार राहील. याशिवाय त्वचेच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळेल. रोज रात्री झोपताना नियमित नाईट क्रीम लावल्यास महिनाभरात सकारात्मक परिणाम दिसून येईल आणि चेहऱ्यावर ग्लो येईल.
कोणत्याही खास प्रसंगी चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर वाटीमध्ये लिंबाचा रस आणि मध मिक्स करून मिश्रण तयार करावे. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्या. त्यानंतर १० मिनिटं तसेच ठेवून पाण्याने त्वचा स्वच्छ करा. यामुळे त्वचेवरील हरवलेला ग्लो पुन्हा परत येईल आणि चेहरा खूप जास्त उजळदार दिसेल. याशिवाय तुम्ही दही, हळद आणि बेसन फेसपॅक सुद्धा चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे लगेच ग्लो येऊन त्वचा सुंदर दिसते.
रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर विटामिन सी सीरम लावावे. यामुळे त्वचा आतून सुधारण्यास मदत होते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता आणि काळे डाग कमी करण्यासाठी रात्रीच्या वेळी कोणतेही क्रीम आणि सीरम लावावे. कोणतेही नाईट क्रीम रात्रीच्या वेळी लावावे. हा वेळ त्वचा दुरुस्तीसाठी अतिशय उत्तम मानला जातो. फेस क्रीम लावल्यानंतर हलक्या हाताने मसाज करावे. यामुळे त्वचेमधील रक्तभिसरण सुधारते आणि त्वचेच्या पेशींचे कार्य सुरळीत चालू राहते.






