Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amarnath Yatra 2026 : या तारखेपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा, जाणून घ्या घरबसल्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस

Amarnath Yatra Registration Process: भारतातील सर्वात मोठी यात्रा अमरनाथ यात्रा आता लवकरच सुरु होणार आहे. यासाठीचे रजिस्ट्रेशन सुरु करण्यात आले असून यात्रेकरु ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे बुकिंग करु शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 16, 2026 | 08:34 AM
Amarnath Yatra 2026 : या तारखेपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा, जाणून घ्या घरबसल्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस

Amarnath Yatra 2026 : या तारखेपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा, जाणून घ्या घरबसल्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस

Follow Us
Follow Us:
  • अमरनाथ यात्रा लवकरच सुरू होणार असून नोंदणी प्रक्रिया सुरु आहे.
  • यात्रेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन रजिस्ट्रेशनसह आरोग्य प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
  • पहलगाम आणि बाल्टाल असे दोन मार्ग उपलब्ध असून RFID कार्ड आवश्यक आहे.
भारतातील सर्वात मोठ्या यात्रांपैकी एक म्हणून ओळखली जाणारी अमरनाथ यात्रा यावर्षी लवकरच सुरु होणार असल्याची माहिती आहे. जम्मू-काश्मीरमधील हिमालयात ३,८८८ मीटर उंचीवर वसलेल्या पवित्र गुहेतील बर्फाच्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी ही यात्रा केली जाते. ही एक अत्यंत कठीण धार्मिक यात्रा मानली जाते. श्री अमरनाथ तीर्थक्षेत्र मंडळ या तीर्थयात्रेचे आयोजन करते. यावेळी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. भाविकांना आता यंदाच्या अमरनाथ यात्रेची ओढ लागली असून याची तारीख आता समोर आली आहे. माहितीनुसार, यंदा १५ एप्रिल २०२६ पासून अमरनाथ यात्रेला सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी रजिस्ट्रेशन प्रकिया सुरु आहे. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे घरबसल्या यात्रेची नोंदणी करु शकता. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेलिकॉप्टरने फक्त इतक्या रुपयांत पोहचू शकता बाबा केदारनाथ यांच्या दरबारी, बुकिंगची संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या

रजिस्ट्रेशन कसे करावे?

ऑनलाइन प्रोसेस

तुम्हीही जर अमरनाथ तीर्थयात्रेला जाण्याचा प्लॅन करत असाल यासाठी तुमचे रजिस्ट्रेशन फार महत्त्वाचे आहे. ऑनलाइन नोंदणी अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल ॲपद्वारे करता येते. यासाठी मोबाईल नंबर आणि ईमेलद्वारे व्हेरिफिकेशन करणे आवश्यक असेल. यात तुम्हाला निवार्य आरोग्य प्रमाणपत्र आणि ८ एप्रिल २०२६ नंतर काढलेला पासपोर्ट-आकाराचा फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे.

ऑफलाइन प्रोसेस

यात्रेची ऑफलाइन नोंदणी करायची असेल तर यासाटी तुम्हाला बँक शाखांंमध्ये अर्ज करावा लागेल. ही प्रक्रिया ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर आधारित असेल. अर्ज करताना आरोग्य प्रमाणपत्र आणि आधार कार्डसारखा ओळखपत्र पुरावा तुम्हाला अनिवार्य असेल. बँकेत बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन देखील केले जाईल. यासाठी प्रति व्यक्ती ₹150 शुल्क आकारले जाईल.

RFID कार्ड आहे आवश्यक

यात्रेदरम्यान तुमच्याकडे प्रत्येक यात्रेकरूने जम्मू आणि काश्मीरमधील नियुक्त केंद्रांवरून RFID कार्ड मिळवणे अनिवार्य आहे. या कार्डशिवाय तुम्हाला डोमेल किंवा चंदनवारीसारख्या प्रवेशद्वारांच्या पुढे प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे लक्षात ठेवा यात्रा करताना तुम्हाला हे कार्ड घ्यायचेच आहे. यात्रेत सामील होण्यासाठी काही निकश देखील असतात ज्याच्यांवर आधारित तुम्हाला यात्रेत सामील होण्यासाठी परवानगी दिली जाते. हे निकष आरोग्याच्या दृष्टीने तयार केलेले असतात कारण ही यात्रा एक खडतर यात्रा असल्याचे मानले जाते. यानुसार फक्त १३ ते ६० वयोगटातील भाविकांना यात्रेत समील होण्याची परवानगी असते. गर्भवती महिलांना, विशेषतः ज्या सहा आठवड्यांपेक्षा जास्त गर्भवती आहेत, त्यांना प्रवास करण्याची परवानगी नाही. याशिवाय प्रत्येक यात्रेकरुसोबत अधिकृत आरोग्य प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक असते.

भक्तांसाठी आनंदाची बातमी! लवकरच खुले होणार बद्रीनाथ धामचे कपाट… या दिवसापासून घेता येणार दर्शन

प्रवासाच्या मार्गाची निवड

प्रवासासाठी दोन मुख्य मार्ग आहेत: पहलगाम आणि बाल्टाल. पहलगाम हा पारंपारिक सर्वात लांब मार्ग आहे जो अंदाजे ४६ किमीइतका असल्याचे सांगितले जाते. तर बाल्टाल हा लहान मार्ग आहे जो अंदाजे १४ किलोमीटरचा आहे. पण हा मार्ग पहलगामपेक्षा अधिक कठीण असल्याचे सांगितले जाते. याशिवाय ज्यांना चालण्यास त्रास होतो त्यांच्यासाठी या यात्रेत हेलिकॉप्टर सेवेची देखील सोय करण्यात येते. मार्गावर तंबू, निवास आणि इतर सेवा पुरवल्या जातात. यात्रेदरम्यान पर्वताची उंची आणि थंड हवामान आव्हानात्मक ठरु शकते. जाताना सीजननुसार योग्य कपड्यांची निवड करणे फायद्याचे ठरते.

Web Title: Amarnath yatra 2026 amarnath yatra 2026 date revealed know the registration process travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 08:33 AM

Topics:  

  • Amarnath Yatra
  • Religious Places
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : भारतीय पर्यटकाने दाखवले ओमानचे अद्भुत सौंदर्य, 400 वर्षे जुनी कहाणी
1

Travel News : भारतीय पर्यटकाने दाखवले ओमानचे अद्भुत सौंदर्य, 400 वर्षे जुनी कहाणी

जन्माष्टमीला मथुरा-वृंदावनाला जात असाल तर या 4 ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका
2

जन्माष्टमीला मथुरा-वृंदावनाला जात असाल तर या 4 ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

नवीन ट्रॅव्हल थेरपी! ना नेटवर्क, ना नोटिफिकेशन… भारतातील सायलंट टुरिस्ट ठिकाणं जाणून घ्या
3

नवीन ट्रॅव्हल थेरपी! ना नेटवर्क, ना नोटिफिकेशन… भारतातील सायलंट टुरिस्ट ठिकाणं जाणून घ्या

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?
4

नेपाळमधील पूरग्रस्त भागाचे जगाला गूढ आकर्षण! पुराचा धोका असूनही भारतासह परदेशी पर्यटकांची गर्दी इथे का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.