Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्तर प्रदेशच्या नोएडात आहे रावणाचे गाव! इथे दसरा साजरा केला जात नाही तर शोक व्यक्त केला जातो

दसरा म्हटलं की रावण दहन आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाची परंपरा डोळ्यांसमोर येते. मात्र, भारतात असं एक गाव आहे, जिथे दसऱ्याला रावण दहन करण्याऐवजी त्याची पूजा केली जाते. या गावाची परंपरा नेमकी काय आहे, जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 16, 2026 | 08:52 AM
उत्तर प्रदेशच्या नोएडात आहे रावणाचे गाव! इथे दसरा साजरा केला जात नाही तर शोक व्यक्त केला जातो

उत्तर प्रदेशच्या नोएडात आहे रावणाचे गाव! इथे दसरा साजरा केला जात नाही तर शोक व्यक्त केला जातो

Follow Us
Follow Us:
  • उत्तर प्रदेशातील या गावाचे नाव रावणाचे वडील ऋषी विश्रवा यांच्याशी जोडले जाते.
  • गावातील लोक रावणाला आपला पूर्वज मानतात आणि दसऱ्याला त्याची पूजा करतात.
  • या गावातील रावण मंदिर आणि प्राचीन शिवलिंगाची परंपरा विशेष मानली जाते.
काही दिवसांनी दसरा सण येणार आहे. या दिवशी देशभरात रावणाच्या पुतळ्याला जाळून सण साजरा केला जातो. वाईट विचारांचा चांगल्यावर विजय हा या सणाचा मूळ उद्देश असतो. यंदा २० ऑक्टोबर रोजी देशभरात दसरा सण साजरा केला जाणार आहे. पण तुम्हाला माहितीये का? देशात एक असे ठिकाणही आहे जिथे हा सण साजरा केला जात नाही. इथे रावण दहन तर दूरच या दिवशी रावणाप्रती शोक व्यक्त केला जातो. आम्ही तुम्हाला सांगतो की, या ठिकाणी रावणाचा जन्म झाला होता, म्हणजेच हे ठिकाण रावणाचे जन्मस्थळ आहे. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा हे रावणाचे गाव आहे. इथे रावणाची पूजा केली जाते आणि दसऱ्यादिवशी त्याच्या जाण्याचा शोक व्यक्त केला जातो. इतकेच नाही तर इथे रावणाचे एक मंदिर देखील आहे.

Travel News : UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारताच्या 4 ठिकाणांचा समावेश!

गावाचे नाव काय आणि काय आहे इतिहास

उत्तर प्रदेश राज्यातील ग्रेटर नोएडा येथील बिसरख या गावात रावणाचे मंदिर पाहायला मिळते. या गावाचे नाव देखील रावणाच्या वडिलांशी जोडलेले आहे. इथे आजही रावणाची पूजा केली जाते. बिसरख हे नाव रावणाचे वडील, ऋषी विश्वराव यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. मूळतः विश्वेश्वर म्हणून ओळखले जाणारे हे गाव नंतर सोयीसाठी बिसरख असे बदलण्यात आले.

शिवपुराणात आहे उल्लेख

मिळालेल्या माहितीनुसार, शिवपुराणमध्ये विश्वेश्वर गावाचा उल्लेख आढळतो. विश्वराव ऋषींनी येथे शिवलिंगाची स्थापना केली आहे असे या शिवपुराणात लिहिलेले आहे. रावण आणि त्याचे वडिल शंकराचे मोठे भक्त होते. रावणाच्या या मंदिरात एक पुजारीही आहे जो दररोज मंदिराची साफ-सफाई करतो आणि रावणाच्या मूर्तीला पोशाख घालतो. इथे लोक रावणाच्या दर्शनासाठी येतात. या गावात रावणाचा पुतळा नाही जाळला जात. दसऱ्याच्या दिवशी लोक रावणाच्या मंदिरात जातात, दर्शन घेतात आणि हवन-यज्ञात सामील होतात.

Travel News : जगातील एकमेव तरंगणारे उद्यान आहे भारतात! कुठे आहे ते जाणून घ्या

रावणाला मानतात आपले पूर्वज

माहितीनुसार, बिसरख गावातील लोक रावणाला आपले पूर्वज मानतात. हेच कारण आहे की, इथे रावण दहन केले जात नाही. मंदिरात रावणाच्या अनेक प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. इथे आतल्या बाजूला प्राचीन अष्टभूमी शिवलिंग ठेवण्यात आला आहे, ज्यावर लोक पाणी अर्पण करतात.

Web Title: Bisrakh village greater noida ravana temple dussehra ravana worship not ravana dahan history nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 08:51 AM

Topics:  

  • Festival News
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : जगातील एकमेव तरंगणारे उद्यान आहे भारतात! कुठे आहे ते जाणून घ्या
1

Travel News : जगातील एकमेव तरंगणारे उद्यान आहे भारतात! कुठे आहे ते जाणून घ्या

कोट्यवधी रुपये खर्चूनही शेवगाव वनपर्यटन प्रकल्प तहानलेलाच! 3 अधिकाऱ्यांची वेगवेगळी उत्तरे; निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह
2

कोट्यवधी रुपये खर्चूनही शेवगाव वनपर्यटन प्रकल्प तहानलेलाच! 3 अधिकाऱ्यांची वेगवेगळी उत्तरे; निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह

जगातील सर्वात बेस्ट देशांची यादी आली समोर, पहिल्या स्थानावर ग्रीस तर भारताचा कितवा क्रमांक?
3

जगातील सर्वात बेस्ट देशांची यादी आली समोर, पहिल्या स्थानावर ग्रीस तर भारताचा कितवा क्रमांक?

Solo Trip : एकट्याने इंटरनॅशनल प्रवास करायचाय? आशियातील हे 3 देश ठरतील स्वस्त आणि सुरक्षित
4

Solo Trip : एकट्याने इंटरनॅशनल प्रवास करायचाय? आशियातील हे 3 देश ठरतील स्वस्त आणि सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.