
Travel News : जगातील एकमेव तरंगणारे उद्यान आहे भारतात! कुठे आहे ते जाणून घ्या
Travel News : UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारताच्या 4 ठिकाणांचा समावेश!
लोकटक तलाव
मणिपूर राज्यातील पाण्यावर तरंगणारे हे राष्ट्रीय उद्यान लोकटक तलावावर आहे. या उद्यानाचे नाव आहे केबुल लामजाओ. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण असे तलाव जगभरात तुम्हाला इतर कोणत्याही ठिकाणी पाहायला मिळणार नाही. या उद्यानाची सर्वात खास गोष्ट म्हणजे ‘फुम्डीवर’ (तरंगणाऱ्या फांद्या) हे उद्यान उभे आहे. स्थानिकांच्या मते, फुम्डी ही एक पाण्यात तरंगणारी वनस्पती आहे. तलावात तुम्हाला अशा अनेक फुम्ड्या दिसून येतील. याच्या आधारेच तुम्ही पाण्यावर तरंगत तलावाचा विहार करु शकता. कालांतराने साचलेल्या वनस्पती, माती आणि सेंद्रिय पदार्थांनी ही फुम्डी तयार झालेली असते.
जगातील सर्वात बेस्ट देशांची यादी आली समोर, पहिल्या स्थानावर ग्रीस तर भारताचा कितवा क्रमांक?
लोकटक तलावाची खासियत
भारताच्या पूर्व भागात हे लोकटक तलाव वसले आहे. तलावाच्या पाण्यावर तरंगणारी फुम्डी या तलावाची खास ओळख आहे. काही लोक या तरंगत्या रचनांवरच राहतात. तुम्हाला फुमड्यांवर ‘फुमसांग’ नावाच्या पारंपारिक झोपड्या दिसून येतील. येथील दृष्य पाहताना फार छान दिसते. फिरायला जात असाल तर इथे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात सुदंर फोटोज किंवा व्हिडिओज क्लिक करु शकता. पर्यटक इथे नौकाविहार आणि जलक्रीडांचा आनंद लुटु शकता. तुम्हाला इथे तपकिरी शिंगांचे हरीण ज्यांना संगाई हिरण म्हणून ओळखले जाते, ते देखील पाहायला मिळतील. इथे अनेक प्रकारचे पानपक्षी देखील पाहायला मिळतात. एकंदरीतच निसर्गाची आवड असेल आणि शांत ठिकाणी फिरण्याचा विचार करत असाल तर पाण्यावर तरंगणारे हे उद्यान तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल.
Ans: केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान हे भारतातील पाण्यावर तरंगणारे राष्ट्रीय उद्यान आहे.
Ans: हे उद्यान मणिपूर राज्यातील लोकटक तलावावर वसलेले आहे.
Ans: येथील फुम्डी नावाच्या तरंगत्या वनस्पती, माती आणि सेंद्रिय पदार्थांच्या थरांवर उद्यानाची परिसंस्था अवलंबून आहे. हे संगाई हरणाचेही महत्त्वाचे अधिवास आहे.