Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात निम्म्याहून अधिक गर्भवती महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता; नवजात बाळांनाही धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Anemia in pregnancy : राज्यातील निम्म्याहून अधिक गर्भवती महिलांना रक्तक्षयाचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. याचा थेट परिणाम नवजात बाळांच्या आरोग्यावर होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 11, 2026 | 07:55 PM
Anemia in pregnancy

Anemia in pregnancy

Follow Us
Follow Us:
  • राज्यात निम्म्याहून अधिक गर्भवती महिलांमध्ये होमेग्लोबिनची कमतरता
  • नवजात बाळांनाही धोका
  • जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Anemia in pregnancy : सुनयना सोनवणे :  मातृत्वाच्या उंबरठ्यावर असतानाच राज्यातील निम्म्याहून अधिक गर्भवती महिलांना रक्तक्षयाचा सामना करावा लागत असल्याचे चिंताजनक वास्तव समोर आले आहे. अपुरे पोषण, लोहयुक्त आहाराची कमतरता आणि आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे गर्भवती महिलांमधील हिमोग्लोबिनची पातळी धोकादायकरीत्या कमी होत असून त्याचा थेट परिणाम नवजात बाळांच्या आरोग्यावर होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

Maternal Mortality Rate : ‘आई सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित’; पुण्यात मातामृत्यूदरात मोठी घट, गर्भवतींची वेळेवर तपासणी ठरली प्रभावी

धक्कादायक आकडेवारी

सन २०२५ च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, देशातील १५ ते १९ वर्षे वयोगटातील ६३ टक्के मुलींमध्ये रक्तक्षय आढळून आला आहे. तर १९ ते ४९ वर्षे वयोगटातील ५३ टक्के महिलांमध्ये रक्तक्षयाचे निदान झाले आहे. गर्भवती महिलांपैकी निम्म्याहून अधिक महिलांना रक्तक्षय असल्याचेही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

लोह आणि हिमोग्लोबिनची कमतरतेची लक्षणे

गर्भारपणात आईच्या शरीरात बाळाच्या वाढीसाठी अतिरिक्त रक्तनिर्मितीची प्रक्रिया सुरू असते. मात्र, शरीरात लोहाची कमतरता असल्यास हिमोग्लोबिनची पातळी घसरते. परिणामी अशक्तपणा, थकवा, त्वचा निस्तेज होणे, चिडचिड आणि शारीरिक कमजोरी अशी लक्षणे दिसू लागतात. योग्य वेळी उपचार आणि पोषण न मिळाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.

बाळाच्या आरोग्यावर होणारे परिणाम

तज्ज्ञांच्या मते, गर्भारपणातील रक्तक्षयामुळे कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, अकाली प्रसूती, बाळाच्या शारीरिक व मानसिक विकासात अडथळे, कमी प्रतिकारशक्ती आणि नवजात बालकांमध्येही रक्तक्षयाचा धोका वाढतो. केंद्र आणि राज्य शासनाकडून ‘ॲनिमियामुक्त भारत’, ‘जननी सुरक्षा अभियान’, ‘प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान’ यांसारख्या योजना राबविल्या जात असल्या, तरी रक्तक्षयाचे प्रमाण अपेक्षितरीत्या कमी होत नसल्याचे चित्र आहे.

राज्य आरोग्य विभागाचची कामगिरी आणि उपचार

राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, ‘ॲनिमियामुक्त भारत’ मोहिमेंतर्गत मार्च २०२६ अखेर महाराष्ट्रात २३ लाख ५० हजार ३०८ गर्भवती महिलांमध्ये प्रसूतिपूर्व रक्तक्षयाचे निदान झाले. त्यापैकी १२ लाख ०३ हजार ३६९ महिलांना प्रसूतिपश्चात उपचारात्मक औषधे देण्यात आली, तर तीव्र रक्तक्षय असलेल्या ७६ हजार ८१ गर्भवती महिलांना लोहयुक्त इंजेक्शन देण्यात आले.

शहरी-ग्रामीण परिस्थिती

दरम्यान, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात रक्तक्षयाचे प्रमाण अधिक दिसत असले, तरी ग्रामीण भागात तपासण्यांचे प्रमाण कमी असल्याने प्रत्यक्ष स्थिती अधिक गंभीर असू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. पुणे शहर स्त्रीरोगतज्ज्ञ संघटनेने नुकत्याच आयोजित केलेल्या रक्तक्षय तपासणी शिबिरात तपासलेल्या ८०० महिलांपैकी तब्बल ६५ टक्के महिलांमध्ये तीव्र रक्तक्षय आढळून आला.

तज्ज्ञांचा सल्ला

स्त्रीरोगतज्ञ डॉ. शुभदा पाटील सांगतात,  ‘राज्य शासन विविध मोहिमा राबवत असले, तरी महिलांमध्ये रक्तक्षयाविषयी अपेक्षित जनजागृती झालेली नाही. अनेकदा औषधे वेळेवर घेतली जात नाहीत, त्यामुळे समस्या वाढत जाते. किशोरवयातच मुलींमध्ये रक्तक्षय आढळतो आणि त्याच अवस्थेत त्या गर्भधारणेच्या टप्प्यावर पोहोचतात. त्यामुळे रक्तक्षय रोखण्यासाठी किशोरवयापासूनच विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.’

वाढते वय प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या गुणवत्तेवर कसा परिणाम करते? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती

Web Title: Anemia in pregnancy maharashtra pregnant women hemoglobin deficiency risk to newborns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • Health News
  • lifestyle news
  • Marathi News

संबंधित बातम्या

पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ झालेत? मग त्यांना फेकू नका, ३ सोप्या ट्रिकने पुन्हा बनवा क्रंची आणि कुरकरीत पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ
1

पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ झालेत? मग त्यांना फेकू नका, ३ सोप्या ट्रिकने पुन्हा बनवा क्रंची आणि कुरकरीत पावसाळ्यात नमकीन पदार्थ मऊ

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात
2

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?
3

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन
4

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.