(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
MSRTC च्या NCMC कार्ड ला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पुण्यात महिनाभरात १ लाखांहून अधिक अर्ज
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ मध्ये शहरात ७९ मातामृत्यूंची नोंद झाली होती. पुढील वर्षात हा आकडा ६७ वर आला, तर २०२५-२६ मध्ये तो आणखी घटून ४५ पर्यंत पोहोचला आहे. मातामृत्यूदरही १२२ वरून ७७ पर्यंत खाली आला असून, आरोग्य विभागासाठी ही महत्त्वाची सकारात्मक नोंद मानली जात आहे. राज्य पातळीवरही परिस्थितीत सुधारणा होताना दिसत आहे.
आरोग्य विभागाकडून गर्भवती महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. नियमित आरोग्य तपासण्या, आयर्न आणि फॉलिक ॲसिड गोळ्यांचे वितरण, जननी सुरक्षा योजना, मोफत रक्ततपासण्या आणि प्रसूतीपूर्व समुपदेशन याचा मोठा फायदा होत आहे. विशेषतः ‘हाय रिस्क प्रेग्नन्सी’ असलेल्या महिलांवर अधिक लक्ष केंद्रीत केले जात आहे. पुणे हे राज्यातील मोठे उपचार केंद्र असल्याने इतर जिल्ह्यांमधूनही गंभीर रुग्ण उपचारासाठी येथे येतात. त्यामुळे काही प्रमाणात आकडेवारीवर त्याचा परिणाम होत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तथापि, प्रसूतीनंतरचा काळ अजूनही चिंतेचा विषय ठरत आहे.
२०२५-२६ मधील ४५ मातामृत्यूंपैकी ३४ मृत्यू हे प्रसूतीनंतर झाल्याचे समोर आले आहे. वेळेत उपचार न मिळणे, अतिरक्तस्राव, रक्तदाबातील गुंतागुंत आणि उशिरा रुग्णालयात दाखल होणे ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले. ‘आई सुरक्षित असेल, तर संपूर्ण कुटुंब सुरक्षित राहते,’ असे सांगत आरोग्य तज्ज्ञांनी गर्भधारणेपासून प्रसूतीनंतरच्या काळापर्यंत सातत्याने वैद्यकीय देखरेखीचे महत्त्व अधोरेखित केले. मातृदिनाच्या निमित्ताने सुरक्षित मातृत्वाबाबत जागरूकता वाढविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
वयोगटानुसार मातामृत्यू
वर्ष २० पेक्षा कमी २० ते ३० ३० पेक्षा जास्त
२०२३-२४ ३ ५० २५
२०२४-२५ ७ ४० २०
२०२५-२६ ४ ३० ११
एकूण ७९ ६७ ४५






