Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने लावा बेसन आणि दही, त्वचा राहील कायमच तरुण

वाढत्या वयात महिलांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याची जास्त शक्यता असते. त्वचेवर आलेल्या सुरकुत्यांमुळे त्वचा अधिक निस्तेज दिसू लागतात. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही दही बेसनाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 30, 2025 | 09:23 AM
चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी 'या' पद्धतीने लावा बेसन आणि दही

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी 'या' पद्धतीने लावा बेसन आणि दही

Follow Us
Follow Us:

पूर्वीच्या काळापासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बेसनाचा वापर केला जात आहे. बेसन आणि दह्याचे मिश्रण नियमित आठवडाभर चेहऱ्यावर लावल्यास त्वचा अधिक सुंदर आणि उजळदार होण्यास मदत होईल. हल्ली वाढलेले प्रदूषण, धूळ, माती इत्यादी अनेक गोष्टींमुळे त्वचा अतिशय निस्तेज आणि कोरडी होऊन जाते. त्वचेच्या छिद्रांमध्ये साचून राहिलेल्या घाणीमुळे त्वचा तेलकट होते. यामुळे चेहऱ्यावर सतत पिंपल्स येणे किंवा त्वचेसंबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. याशिवाय वाढत्या वयात चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, बारीक रेषा येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या क्रीम किंवा इतर स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात.(फोटो सौजन्य – istock)

Skin allergies in monsoon: पावसाळ्यात त्वचेस होणारे धोके आणि त्यावरील सोपे उपाय

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी बेसन आणि दह्याचा वापर करू शकता. दही त्वचा कायमच हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. बेसनामध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी गुणधर्म आढळून येतात. याशिवाय दह्यामध्ये लॅक्टिव अ‍ॅसिड आढळून येते. यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग, पिंपल्स किंवा त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो. बेसन आणि दह्याचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यास सुरकुत्या, बारीक रेषा किंवा त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल.

बेसन दह्याचा फेसपॅक:

बेसन दह्याचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात दही टाकून मिक्स करा. तयार केलेली पेस्ट व्यवस्थित मिक्स करून संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्या. त्यानंतर काहीवेळ ठेवून त्वचा नंतर पाण्याने स्वच्छ करा. हा उपाय केल्यामुळे त्वचेवर वाढलेल्या सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होण्यास मदत होईल. त्वचेवरील डाग, चट्टे दूर कमी करण्यासाठी बेसन गुणकारी आहे. बेसन दह्याचा फेसपॅक त्वचेवर 20 मिनिटं ठेवावा. यामुळे त्वचा कायम सुंदर आणि चमकदार राहते.

आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले ‘हे’ पौष्टिक लाडू केसांसाठी ठरतील प्रभावी, शरीराला मिळेल भरपूर पोषण

बेसन दही आणि हळद:

हळदीमध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म त्वचेवर वाढलेले काळे डाग कमी करण्यासाठी मदत करतात. मोठ्या वाटीमध्ये बेसन, दही आणि चिमूटभर हळद घेऊन व्यवस्थित पेस्ट मिक्स करा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून 20 मिनिट तसेच ठेवून घ्या. त्यानंतर हाताना थोडस पाणी लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवर वाढलेले काळे डाग आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल. त्वचेवरील डाग आणि पिगमेंटेशन दूर करण्यासाठी हळद अतिशय प्रभावी ठरते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Apply besan and curd in this way to reduce wrinkles and fine lines on the face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 09:23 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
2

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
3

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
4

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.