आठवड्यातून दोनदा केसांना लावा 'हे' गुणकारी तेल!
बदललेल्या वातावरणाचा परिणाम आरोग्यासोबतच केसांवर सुद्धा लगेच दिसून येतो. केस गळणे, केस तुटणे किंवा केसांसंबधीत इतरही अनेक समस्या उद्भवू लागतात. केसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर बऱ्याचदा महिलांचा आत्मविश्वास काहीसा कमी होऊन जातो. त्यामुळे वर्षाच्या बाराही महिने केसांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने केसांची काळजी घेतल्यास समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागतात. सतत केस गळून केस पातळ होण्याची जास्त शक्यता असते. तसेच टक्कल पडण्याची भीती निर्माण होतो. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर ऑईलचा वापर करतात. मात्र यामध्ये असलेले केमिकल रसायनामुळे केस आणखीनच तुटू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
केस गळणे थांबवण्यासाठी औषधोपचार, शाम्पू, कंडिशनर तसेच महागडे प्रॉडक्ट आणून लावले जातात. पण तरीसुद्धा केसांच्या समस्या कमी होत नाहीत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केस गळती थांबवण्यासाठी आयुर्वेदिक आणि घरगुती पदार्थांपासून बनवलेले तेल बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हे आठवडाभर नियमित केसांवर लावल्यास केसांच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल. याशिवाय तुमचे केस भराभर वाढू लागतील. केसांच्या समस्या उद्भवू लागल्यानंतर कोणतेही केमिकल ट्रीटमेंट किंवा प्रॉडक्ट न लावता घरगुती उपाय करून आराम मिळवावा.
आयुर्वेदिक तेल बनवण्यासाठी आवळा, कडुलिंबाची पाने, कढीपत्ता, कोरफड, जास्वंदीची फुले, मेथीचे दाणे, कलोंजी आणि रोझमेरीची पाने या पदार्थांचा वापर करावा. या पदार्थांच्या वापरामुळे केस गळती थांबेल आणि केस सुंदर चमकदार दिसू लागतील. आवळा, कडुलिंबाची पाने, कढीपत्ता आणि कोरफडीचा गर मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक पेस्ट वाटून घ्या. तयार केलेली नारळाच्या तेलात मिक्स करून संपूर्ण केसांवर व्यवस्थित लावून ठेवा. यामुळे केसांची चमक वाढेल आणि केस सुंदर होतील. ३० मिनिट झाल्यानंतर केस पाणी आणि शॅम्पूच्या मदतीने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळेल.
केस गळतीची समस्या होईल कायमची दूर! साजूक तूप आणि अश्वगंधाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील घनदाट
बऱ्याचदा शरीरात होणाऱ्या हार्मोन्स बदल, वैद्यकीय समस्या, औषधे, ताण किंवा आनुवांशिकतेमुळे केसांच्या समस्या वाढू लागतात. या समस्या वाढू लागल्यानंतर महिला दुर्लक्ष करतात. पण सतत दुर्लक्ष केल्यामुळे केसांमध्ये टक्कल पडण्याची भीती असते. केसांमध्ये टक्कल पडू नये म्हणून आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा. आवळ्यामध्ये विटामिन सी मोठ्या प्रमणावर आढळून येते. तसेच कडुलिंब आणि मेथी दाणे टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी मदत करते.