Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोकेदुखीमुळे हैराण झाला आहात? मग कपाळावर लावा सुंठाचा ‘या’ पद्धतीने लेप, पारंपरिक उपाय करून वेदनांपासून मिळेल आराम

डोकेदुखीच्या त्रासापासून आराम हवा असल्यास सुंठाचा लेप कपाळावर लावून काहीवेळ तसाच ठेवून द्यावा. यामुळे वेदनांपासून आराम मिळतो. चला तर जाणून घेऊया सुंठाचा लेप कपाळावर लावल्यामुळे होणारे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 05, 2026 | 05:30 AM
डोकेदुखीमुळे हैराण झाला आहात? मग कपाळावर लावा सुंठाचा 'या' पद्धतीने लेप, पारंपरिक उपाय करून वेदनांपासून मिळेल आराम

डोकेदुखीमुळे हैराण झाला आहात? मग कपाळावर लावा सुंठाचा 'या' पद्धतीने लेप, पारंपरिक उपाय करून वेदनांपासून मिळेल आराम

Follow Us
Follow Us:

डोकेदुखीची कारणे?
सुंठाचा लेप लावण्याचे फायदे?
सुंठाचा लेप कोणी लावू नये?

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कडक उन्हात कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर डोकेदुखीचा त्रास खूप जास्त वाढतो. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते आणि ज्याच्या परिणामामुळे डोकं दुखणे, उलट्या, चक्कर किंवा शरीरसंबंधित इतरही समस्या उद्भवतात. डोकं दुखण्यास सुरुवात झाल्यानंतर बऱ्याचदा मेडिकलमधील गोळ्या आणून खाल्ल्या जातात. पण वारंवार पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन करणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे किडनी निकामी होणे किंवा कोणत्याही अवयवार परिणाम होऊ शकते. डोके जड वाटणे, थंडीमुळे होणारी अस्वस्थता किंवा कोणत्याही इतर कारणांमुळे डोके दुखीचा त्रास होत असेल तर लगेच गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी घरगुती उपाय करून पाहावेत. अन्यथा डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करून आराम मिळवावा. आज आम्ही तुम्हाला डोकेदुखीच्या वाढत्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी सुंठ कसे वापरावे? यामुळे नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्तन का दुखतात? जाणून घ्या यामागील कारणे आणि लक्षणे, वेळीच उपचार केल्यास मिळेल आराम

डोक्याच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय:

भारतीय स्वयंपाक घरात सुंठ कायमच असते. सुंठाचा वापर सर्दी खोकला किंवा घशात वेदना वाढल्यानंतर केला जातो. आयुर्वेदामध्ये सुंठला विशेष महत्व आहे. शरीरसंबंधित त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावेत. सुंठ स्वभावाने उष्ण असते. त्यामुळे ती कायमच उगळून किंवा पावडर करून खाण्यास दिले जाते. सुंठ कपाळावर उगळून लावल्यास डोकेदुखीच्या त्रासापासून सुटका मिळते आणि थंड वाटते. थंड पदार्थ खाल्ल्यानंतर काहींना लगेच सर्दी खोकला होतो. या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय म्हणजे सुंठ. सुंठीच्या तीव्र सुगंधामुळे आणि उष्ण गुणधर्मांमुळे डोक्यात वाढलेला जडपणा कमी होतो. शरीरात वाढलेल्या थकवा, अशक्तपणा किंवा मानसिक त्रासामुळे जर डोकं दुखत असेल तर सुंठाचा लेप तयार करून लावावा.

सुंठाचा लेप डोक्यावर लावल्यास उब आणि हलकी झिणझिण होते, ज्यामुळे वेदना कमी होतात. आयुर्वेदानुसार सुंठ वात आणि कफ संतुलित करण्यास मदत करते. ज्यांना सतत डोकेदुखी किंवा सर्दी खोकल्याचा त्रासा होतो, अशावेळी सुंठ पावडर खावी. पारंपरिक उपचार पद्धतींमध्ये सुंठला विशेष महत्व आहे. पण सुंठ हा पदार्थ सगळ्यांसाठीच फायदेशीर नाही. संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींच्या कपाळावर सुंठ लेप लावल्यास जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सुंठ लावताना त्यात गुलाब पाणी मिक्स करून लावावे. यामुळे त्वचा थंड राहते.

सकाळी उठल्यानंतर नियमित प्या एक ग्लासभर कोमट पाणी! डिटॉक्सपासून ते ग्लोइंग स्किनपर्यंत शरीराला होतील भरमसाट फायदे

अतिसंवेदनशील त्वचा किंवा त्वचा रोगाने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी सुंठ कपाळावर लावण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याशिवाय तीव्र आणि वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल तर कोणतेही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या चाचण्या आणि उपचार करावेत. मागील बऱ्याच वर्षनुपासून डोकेदुखीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी सुंठचा वापर केला जात आहे. तसेच आहारात सुद्धा तुम्ही सुंठाचा वापर करू शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सुंठाचा लेप डोकेदुखीसाठी कसा उपयोगी ठरू शकतो?

    Ans: सुंठ (सुकलेले आले) पारंपरिक आयुर्वेदात वापरली जाते. काही लोकांच्या अनुभवांनुसार तिचा लेप लावल्याने डोक्यातील जडपणा आणि अस्वस्थता कमी होण्यास मदत होऊ शकते.

  • Que: सुंठाचा लेप कसा तयार करावा?

    Ans: सुंठ पावडरमध्ये थोडे कोमट पाणी घालून घट्ट पेस्ट तयार केली जाते. ही पेस्ट कपाळावर हलक्या हाताने लावली जाते. त्वचा संवेदनशील असल्यास प्रथम चाचणी करावी.

  • Que: सुंठाचा लेप लावल्यानंतर त्वचेवर जळजळ होऊ शकते का?

    Ans: काही व्यक्तींमध्ये सुंठेमुळे सौम्य जळजळ किंवा उष्णता जाणवू शकते. तीव्र जळजळ, लालसरपणा किंवा अॅलर्जीची लक्षणे दिसल्यास लेप त्वरित काढून टाकावा.

Web Title: Are you troubled by a headache then apply a paste of suntha on your forehead in this way dry ginger for headache

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Headache pain
  • Health Care Tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब
1

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
2

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
3

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
4

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.