मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्तन का दुखतात? जाणून घ्या यामागील कारणे आणि लक्षणे, वेळीच उपचार केल्यास मिळेल आराम
पाळीच्या दिवसांमध्ये स्तन का दुखतात?
स्तनांमधील वेदना होण्याची कारणे?
पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी उपाय?
प्रत्येक महिलेला महिन्यातील चार ते पाच दिवस मासिक पाळी येते. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. पण बहुतांश महिलांना, मुलींना मासिक पाळी येण्याच्या आधी वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. शारीरिक समस्या उद्भवल्यानंतर शरीरात खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढू लागतो. अचानक स्तन जड होणे, वेदना किंवा स्पर्श केल्यानंतर टोचल्यासारखे वाटणे, पोट फुगणे , मूड स्विंग्स, कमालीचा थकवा, अचानक काहीतरी गोड किंवा चमचमीत खाण्याची इच्छा वाढणे, चिडचिड वाढणे इत्यादी वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. या त्रासामुळे महिलांना काहीवेळा घरातील साधी कामे करताना सुद्धा खूप जास्त थकवा येतो. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये शरीरात होणाऱ्या बदलांमुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. यामुळे काहीवेळा स्तनांमध्ये खूप जास्त वेदना आणि जडपणा वाढतो. चला तर जाणून घेऊया यामागील कारणे आणि त्यावरील उपाय.(फोटो सौजन्य – istock)
महिलांच्या शरीरात हार्मोन्सची पातळी कायमची सारखी नसते. मासिक पाळी जवळ येण्याच्या सुरुवातीला इस्ट्रोजेन आणि आणि प्रोजेस्टेरॉन या दोन्ही हार्मोन्सच्या पातळीमध्ये चढ उतार होण्यास सुरुवात होते. हे हार्मोन्स काहीवेळा गर्भधारणेसाठी शरीराला तयार करतात. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रोजेस्टेरॉन स्तनांमधील ग्रंथी आणि दुग्धवाहिन्यांचा आकार वाढू लागतो, तर इस्ट्रोजेनमुळे स्तनांच्या उतींमध्ये पाणी साठण्याची प्रमाण वाढते. यामुळे स्तनांमध्ये जड, घट्ट किंवा संवेदनशीलता वाढू लागते. याला वैद्यकीय भाषेमध्ये सायक्लिकल मॅस्टॅल्जिया असे म्हंटले जाते.
मासिक पाळी येऊन गेल्यानंतर सुद्धा स्तनांमध्ये वेदना होत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे. स्तनामध्ये एखादी नवीन गाठ जाणवणल्यास ती पाळीनंतरही विरघळत नसेल तर वेळीच लक्ष द्यावे. याशिवाय स्तनांच्या त्वचेचा रंग बदलणे, लालसरपणा येणे किंवा त्वचा संत्र्याच्या सालीसारखी दिसणे, निप्पलचा आकार बदलणे किंवा त्यातून पाणी आणि चिकट द्रव येत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने उपचार करावेत. यामुळे गंभीर आजाराचा धोका टळेल.
मासिक पाळीचा त्रास पूर्णपणे थांबवणे अशक्य आहे. पण त्यावर तुम्ही जीवनशैलीत थोडे बदल केल्यास वेदनांपासून आराम मिळेल. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये स्तनांना योग्य आधार देणारी आणि योग्य आकाराची, वायर्स नसलेली मऊ सुती ब्रा घालावी. यामुळे हालचाल करताना वेदना कमी होतात. मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कमी मिठाचे आणि कॅफिन नसलेल्या पदार्थांचे सेवन करावे. तसेच भरपूर पाणी प्यावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीराला आलेली सूज कमी होण्यास मदत होते. पण प्रत्येक महिन्याला स्तनांमध्ये वेदना होत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
Ans: मासिक पाळीपूर्वी आणि पाळीदरम्यान शरीरातील इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे स्तनांमध्ये सूज, जडपणा आणि वेदना जाणवू शकतात.
Ans: होय. अनेक महिलांना मासिक पाळीपूर्वी किंवा पाळीदरम्यान स्तनांमध्ये वेदना किंवा संवेदनशीलता जाणवते. हे सहसा हार्मोनल बदलांशी संबंधित असते.
Ans: योग्य आकाराची ब्रा वापरणे, हलका व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे, कॅफिनचे प्रमाण कमी करणे आणि संतुलित आहार घेणे उपयुक्त ठरू शकते.






