तुमचेही डोळे सतत फडफडत आहेत का? शुभ-अशुभ सोडा, यामागे असू शकते 'हे' गंभीर कारण
आपल्यातील अनेकांना डोळे फडफडण्यचा त्रास झाला असेल. ही एक सामान्य समस्या असून याला अनेकदा धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, जर महिलांचा डावा डोळा फडफडला तर ते शुभ मानले जाते. त्याच वेळी, उजवा डोळा फडफडणे अशुभ मानले जाते. तर पुरुषांच्या बाबतीत ते उलट मानले जाते. म्हणजेच, पुरुषांसाठी उजवा डोळा फडफडणे शुभ मानले जाते तर डावा डोळा फडफडणे अशुभ मानले जाते. तुम्हालाही कधी डोळे फडफडणयाचा त्रास जाणवला असेलच, असा अनुभव येताच आपण याला शुभ-अशुभ गोष्टींशी जोडू लागतो मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, ही एक गंभीर आरोग्य स्थिती असू शकते, ज्याकडे दुर्लक्ष करणे आपल्या चांगलेच महागात पडू शकते.
मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांपासून सुटका मिळवण्यासाठी नियमित करा ‘ही’ योगासने, जीवन होईल तणावमुक्त
तुमचे डोळे जर सतत फडफडत असेल तर हे तणावामुळे देखील होऊ शकते. अलीकडेच, एका अमेरिकन डॉक्टरने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आणि ही समस्या का उद्भवू शकते याची कारणे सांगितली. यासोबतच, तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी कधी बोलले पाहिजे याबद्दलही त्यांनी माहिती दिली आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
भारतीय वंशाचे अमेरिकन गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट सौरभ सेठी हे अनेकदा त्यांच्या इंस्टाग्रामवर आरोग्याशी संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करत असतात. अलीकडेच एका व्हिडिओमध्ये त्याने डोळे फडफडण्याचे कारण स्पष्ट केले. डॉक्टर म्हणाले, बरेच लोक असे मानतात की हा ताण आहे, परंतु याची अनेक कारणे असू शकतात.
मायोकिमिया काय आहे?
डोळ्यांच्या फडफडण्याला वैद्यकीय भाषेत ‘मायोकायमिया’ (Myokymia) असे म्हणतात. ही एक सामान्य अवस्था आहे, ज्यामध्ये पापण्या अनैच्छिकपणे फडफडतात. डॉक्टरांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मायोकायमिया ही एक अनैच्छिक आणि पुनरावृत्त होणारी स्नायूंची आकडी (ऐंठन) आहे जी खालच्या पापणीवर परिणाम करते. बहुतांश प्रकरणांमध्ये ते त्रासदायक ठरते.
डोळे फडफडण्याची कारणे
डॉक्टरांनी सांगितले की डोळे मिचकावण्याची अनेक कारणे असू शकतात, ज्यामध्ये टेन्शन, थकवा, कॅफिन ओव्हरडोज, स्क्रीनसमोर तासनतास घालवल्याने, डोळ्यांचा ताण , पोषक तत्वांची कमतरता आणि मॅग्नेशियम कमी पातळी यांचा समावेश होतो.
डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा
डॉक्टरांनी व्हिडिओमध्ये तुम्हाला कधी काळजी करावी हे देखील सांगितले आहे. जर तुम्हाला हा त्रास दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ होत असेल, जर पापणी पूर्णपणे बंद झाली किंवा तुमच्या चेहऱ्याचे इतर भाग देखील फडफडू लागत असेल तर यावर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. याकडे दुर्लक्ष करणे आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते, त्यामुळे तुम्हालाही ही समस्या अधिक काळासाठी उद्भवत असेल तर वेळीच सावध व्हा आणि यावर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.