मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांपासून सुटका मिळवण्यासाठी नियमित करा 'ही' योगासने
चुकीचा आहार, धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, जंक फूडचे सेवन, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. याशिवाय हल्लीच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे आणि कामाच्या तणावामुळे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात आणि मनात मानसिक तणाव निर्माण झाला आहे. मानसिक तणाव वाढल्यानंतर संपूर्ण शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. याशिवाय झोपेची गुणवत्ता खराब होणे, वारंवार चिडचिड करणे, काम करण्याचा कंटाळा येणे, कोणत्याही गोष्टींमध्ये लक्ष न लागणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीराच्या चक्रात अडथळे येतात आणि संपूर्ण जीवन बिघडून जाते. त्यामुळे शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी करणे आवश्यक आहे. तणाव वाढल्यानंतर मन अस्वस्थ होऊन जाते.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरात वाढलेला मानसिक तणाव अनेक आजारांचं कारण बनवतो. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी मन शांत असणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी नियमित सकाळी उठल्यानंतर कोणती योगासने करावीत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे मानसिक तणाव कमी होईल आणि शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. याशिवाय भारत पाकिस्तान युद्धामुळे शरीरात वाढलेला तणाव कमी करण्यासाठी ही योगासने अतिशय गुणकारी ठरतील.
सकाळी उठल्यानंतर नियमित बालासन केल्यास शरीरात वाढलेला तणाव कमी होईल. याशिवाय शरीराला अनेक फायदे होतील. यासाठी शरीरावर सर्व भार टाकून टाचांवर बसा. त्यानंतर पुढे दीर्घश्वास घेऊन हळूहळू पुढे वाका. त्यानंतर कपाळाने जमिनीला स्पर्श करा. यास्थितीमध्ये काहीवेळा राहून पुन्हा एकदा सामान्य स्थितीमध्ये यावे. हे योगासन नियमित केल्यास शरीरात सकारात्मक बदल दिसून येतील.
हाडं होतील मजबूत, शरीरात उसळेल रक्त; फक्त जाणून घ्या अंजीर सरबत पिण्याची योग्य पद्धत
श्वासन केल्यामुळे शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी होतो. तणावमुक्त जीवनशैली जगण्यासाठी सकाळी उठल्यानंतर किंवा इतर वेळी कामातून वेळ काढत नियमित श्वासन करावे. श्वासन करताना सगळ्यात आधी पाठीवर हात पाय लांब करून शांत झोपावे. त्यानंतर दीर्घश्वास घेत श्वास हळुवार सोडावा. हे योगासन नियमित केल्यास मानसिक तणावातून मुक्ती होईल.