तळपायांना पडलेल्या भेगांमुळे पाय कोरडे झाले आहेत? मग सोप्या पद्धतीमध्ये घरीच करा होममेड पेडिक्युअर
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीरासह त्वचा आणि केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. यादिवसांमध्ये त्वचा आणि केसांमध्ये अनेक बदल दिसून येतात. याशिवाय त्वचा कोरडी पडणे, त्वचा अतिशय तेलकट होणे, त्वचेवर घामाचा थर तसाच साचून राहणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. बऱ्याचदा पायांच्या त्वचेची योग्य काळजी घेतली जात नाही. उन्हात किंवा सतत पाण्यात काम करत राहिल्यामुळे पाय अतिशय कोरडे आणि निस्तेज होऊन जातात. तळपायांची त्वचा कोरडी आणि निस्तेज झाल्यानंतर पायावर डेड स्किन तशीच साचून राहते. उष्णतेचा परिणाम पायांवर लगेच दिसून येतो. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये पायांच्या त्वचेची योग्य काळजी घ्यावी. पायांवर जमा झालेली घाण स्वच्छ करून घ्यावी.(फोटो सौजन्य – iStock)
बऱ्याचदा पायांवरील त्वचा खराब आणि निस्तेज झाल्यानंतर महिला किंवा मुली पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर किंवा इतर वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. मात्र या ट्रीटमेंटचा परिणाम फारकाळ पायांच्या त्वचेवर दिसून येत नाही. वारंवार केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करून पेडिक्युअर केल्यास पायांची त्वचा खराब होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पायांची खराब झालेली त्वचा सुधारण्यासाठी घरगुती पद्धतीने पेडिक्युअर करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीने पेडिक्युअर केल्यास पायांची त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार दिसेल.