Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तळ हातांना कायमच घाम येतो? ही समस्या नॉर्मल की कोणत्या आजाराचे गंभीर लक्षण, जाणून घ्या घरगुती उपाय

हातांच्या तळव्यांना वारंवार येणाऱ्या घामामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. हातांना सतत येणाऱ्या घामामुळे चिडचिड होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तळहातांना येणाऱ्या घामावर काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 20, 2025 | 08:41 AM
तळ हातांना कायमच घाम येतो? ही समस्या नॉर्मल की कोणत्या आजाराचे गंभीर लक्षण

तळ हातांना कायमच घाम येतो? ही समस्या नॉर्मल की कोणत्या आजाराचे गंभीर लक्षण

Follow Us
Close
Follow Us:

आपल्यातील अनेकांच्या हातांना कायमच घाम येतो. तळहातांना घाम आल्यानंतर कोणतीही वस्तू हातामधून सहज पडून जाते, हात पूर्णपणे चिकट आणि तेलकट होतात. पेन धरताना सुद्धा अनेक समस्या उद्भवू लागतात. तळ हातांना घाम आल्यानंतर कोणाला हात मिळवताना किंवा एखादी गोष्ट करताना अनेक आत्मविश्वास कमी होऊन जातो. या समस्येला वैद्यकीय भाषेत ‘पामर हायपरहायड्रोसिस’ असे म्हणतात. ही समस्या प्रामुख्याने शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे उद्भवते. याशिवाय जास्त ताण, भीती, चिंता किंवा मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींमुळे हातापायांना खूप जास्त घाम येतो. थंडीच्या दिवसांमध्येसुद्धा तुमच्या हातांना वारंवार घाम येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावेत.(फोटो सौजन्य – istock)

नसांमध्ये अडकलेला सर्व कचरा 100% पडेल बाहेर, आहारतज्ज्ञांनी सांगितला सफरचंद-लिंबाचा खात्रीशीर उपाय; लगेच दिसून येईल फरक

बऱ्याचदा आहारात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे जास्त तेलकट, मसालेदार, शरीरासाठी गरम ठरणारे पदार्थ, कॉफी, चहा किंवा कोल्डड्रिंक इत्यादी पदार्थ शरीरात उष्णता वाढवतात. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे तळव्यांवर आणि शरीराच्या इतर अवयवांवर जास्त घाम येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरोरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आणि तळव्यांवरील घाम कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यामुळे तात्काळ आराम मिळेल.

तळव्यांवरील घामाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय:

पहिला उपाय म्हणजे हात कायमच कोरडे आणि स्वच्छ ठेवण्यासाठी रुमालाचा वापर करावा. रुमाल किंवा टिश्यू जवळ ठेवून वारंवार हात पुसून घ्यावे. याशिवाय कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर हात साबणाचा किंवा हॅन्ड वॉश करून हात स्वच्छ करावे. याशिवाय दिवसातून दोन ते तीन वेळा हात स्वच्छ करताना थंड पाण्याचा वापर करावा. थंड पाण्याने हात धुतल्यास घामग्रंथी शांत होऊन जातात आणि घाम कमी येतो.

शरीरातील घामाच्या ग्रंथी कमी करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करावा. यासाठी पाण्यात बेकिंग सोडा टाकून काहीवेळ पाण्यात पाय बुडवून ठेवावे. त्यानंतर पाय पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय नियमित केल्यास हातापायांना येणारा घाम कमी होईल. याशिवाय हातानं येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळेल. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. चुकीचा आहार घेतल्यामुळे शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात.त्यामुळे आहारात फळे, भाज्या, दही, आणि भरपूर पाणी प्यावे. भरपूर पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर कायमच हायड्रेट राहते. शरीरात वाढलेली उष्णता कमी होते. याशिवाय जेवणात तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे कमीत कमी सेवन करावे.

रात्री कायमच उशिरा झोपता? ‘या’ चुकीच्या सवयी फॉलो केल्यामुळे शरीराचे होईल गंभीर नुकसान, वाढेल मानसिक तणाव

शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करावे. शरीरात वाढलेल्या मानसिक तणावामुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे ध्यान, श्वसनाचे व्यायाम किंवा फिरायला जाणे इत्यादी गोष्टी नियमित करणे आवश्यक आहे. मन शांत ठेवण्यासाठी योग्य आहार, स्वच्छता आणि मानसिक आरोग्याची जास्त काळजी घ्यावी.

FAQs (संबंधित प्रश्न)

हातांना घाम येण्याची कारणे?

हायपरहायड्रोसिस हे एक असे वैद्यकीय स्थिती आहे, ज्यामध्ये घाम ग्रंथी जास्त सक्रिय असतात, ज्यामुळे अनियंत्रित घाम येतो. हे हात, पाय आणि बगलेसारख्या ठिकाणी होऊ शकते.

काही महत्त्वाच्या गोष्टी:

जास्त घाम येणे हे शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या अस्वस्थता आणू शकते.हायपरहायड्रोसिससाठी विविध उपचार उपलब्ध आहेत आणि डॉक्टरांच्या मदतीने यावर मात करता येते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Are your palms always sweaty is this problem normal or a serious symptom of any disease

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 08:41 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • home remedies

संबंधित बातम्या

Diwali 2025: दिवाळीत प्रदूषणाचे वाढते प्रमाण! गर्भवती महिलांनी ‘अशी’ घ्या काळजी
1

Diwali 2025: दिवाळीत प्रदूषणाचे वाढते प्रमाण! गर्भवती महिलांनी ‘अशी’ घ्या काळजी

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा चमचाभर तुपाचे सेवन, पचनाच्या समस्या कायमच्या होतील नष्ट
2

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा चमचाभर तुपाचे सेवन, पचनाच्या समस्या कायमच्या होतील नष्ट

यंदाच्या दिवाळीमध्ये चेहऱ्यावर येईल तेजस्वी ग्लो! मसूर डाळीचा वापर करून ‘या’ सोप्या पद्धतीमध्ये बनवा फेसपॅक, त्वचा होईल सुंदर
3

यंदाच्या दिवाळीमध्ये चेहऱ्यावर येईल तेजस्वी ग्लो! मसूर डाळीचा वापर करून ‘या’ सोप्या पद्धतीमध्ये बनवा फेसपॅक, त्वचा होईल सुंदर

शरीरातील Bacterial Infection टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पौष्टिक पदार्थांचे सेवन, सद्गुरूंनी  सांगितलेला प्रभावी उपाय
4

शरीरातील Bacterial Infection टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ पौष्टिक पदार्थांचे सेवन, सद्गुरूंनी सांगितलेला प्रभावी उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.