काय घ्यावी काळजी
शारीरिक संबंध ठेवणे ही केवळ एक शारीरिक प्रक्रिया नाही तर ती तुमच्या आरोग्यासाठी आणि मानसिक संतुलनासाठीही महत्त्वाची आहे. मात्र, शारीरिक संबंध ठेवल्यानंतर केलेल्या काही चुका तुमच्या शरीरात काही आजार निर्माण करू शकतात. अनेकदा या जिव्हाळ्याच्या क्षणानंतर लोक अशा काही सवयींकडे दुर्लक्ष करतात, ज्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतात.
जर तुम्हीही शारीरिक संबंधांनतर विचार न करता काही काम करत असाल तर सावधान, कारण या सवयींमुळे तुमच्या शरीरात संसर्ग आणि इतर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. चला जाणून घेऊया शारीरिक संबंध ठेवल्यानंतर कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत जेणेकरून तुम्ही निरोगी आणि आजारांपासून दूर राहाल याबाबत अधिक माहिती दिली आहे, डॉक्टर माधव भागवत यांनी (फोटो सौजन्य – iStock)
स्वच्छतेकडे दुर्लक्ष
स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते
शारीरिक संबंधांनंतर शरीर स्वच्छ करणे खूप गरजेचे आहे. या दरम्यान, घाम आणि शरीरातील इतर द्रव त्वचेवर जमा होतात, ज्यामुळे बॅक्टेरिया आणि संसर्ग होऊ शकतो. विशेषत: महिलांसाठी योनीमार्गाच्या स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून मूत्रमार्गात संक्रमण (यूटीआय) सारखे आजार टाळता येतील.
पाणी न पिणे
संभोगानंतर पाणी प्यावे
शारीरिक संबंधांनंतर शरीरात आर्द्रतेची कमतरता असू शकते, विशेषत: जर तुम्ही दीर्घ कालावधीसाठी शारीरिक संबंध ठेवले असतील तर पाणी प्यायल्याने शरीरातील ओलावा परत येतो आणि शरीर हायड्रेट राहते. तसेच, मूत्रमार्गाचे संक्रमण टाळण्यासाठी पाणी पिणे महत्वाचे आहे, कारण ते तुमची मूत्र प्रणाली स्वच्छ करते.
हेदेखील वाचा – सकाळीच शारीरिक संबंध ठेवाल तर मिळतील कमालीचे फायदे, रिसर्चमध्ये खुलासा
टॉयलेटला न जाणे
टॉयलेटला जाणे आवश्यक आहे
शारीरिक संबंधांनंतर टॉयलेटमध्ये जाणे ही एक महत्त्वाची पायरी आहे, विशेषतः महिलांसाठी. असे केल्याने संसर्गाचा धोका कमी होतो, कारण बॅक्टेरिया लघवीद्वारे नष्ट होतात. त्यामुळे ही सवय कधीही विसरू नका. तुम्ही जर शारीरिक संबंधांनंतर लघवी करायला जात नसाल तर तुम्हाला संसर्गजन्य आजार होऊ शकतात
घाणेरडे कपडे घालू नका
घामाचे वा घाणेरडे कपडे घालणे त्रासदायक ठरेल
जर शारीरिक संबंधांनंतर तुम्ही दिवसभर घातलेले कपडे परिधान केले तर ते चुकीचे ठरते. घाणेरड्या आणि घामाच्या कपड्यांमुळे त्वचेवर बॅक्टेरिया वाढू शकतात, ज्यामुळे त्वचा संक्रमण आणि अलर्जी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही शारीरिक संबंध संपल्यानंतर चांगले आणि स्वच्छ कपडे घालावेत.
हेदेखील वाचा – वयानुसार दर महिन्यात किती वेळा ठेवावे शारीरिक संबंध? धक्कादायक आकडे अहवालातून समोर
थंड पाणी किंवा सिगारेट टाळा
थंड पाणी वा सिगरेट पिऊ नये
शारीरिक संबंधांनंतर लगेच थंड पाणी पिणे किंवा सिगारेट ओढणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्याचा रक्ताभिसरणावर परिणाम होऊन आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे यापैकी कोणतीही क्रिया तुम्ही करू नका. पाणी पिणे गरजेचे आहे. मात्र ते पाणी साधे असावे याची काळजी तुम्ही घ्या.