मोठी बातमी! 'सार्वजनिक आरोग्य महत्वाचं'; कबुतरखान्यावर तूर्तास बंदीच, हायकोर्टाचा निर्णय
मुंबई: दादरमधील कबुतरखाना हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. महापालिकेने या ठिकाणी कबुतरांना अन्न, पाणी देण्यास बंदी केली होती. त्यानंतर या ठिकाणी मोठे आंदोलन जैन समाजाकडून करण्यात आले होते. मात्र आज मुंबई हायकोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली आहे. मुंबई हायकोर्टाने तूर्तास तरी कबुतरांना अन्न, पाणी देण्यास बंदी कायम ठेवली आहे. सार्वजनिक आरोग्य महत्वाचे असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
हायकोर्टात काय घडले?
आज कबुतरखाना प्रकरणी हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळेस आमच्यासाठी सार्वजनिक आरोग्य महत्वाचे असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे सध्या तरी कबुतरांना अन्न, पाणी देण्यास हायकोर्टाने बंदी कायम ठेवली आहे. आता पुढील सुनावणी चार आठवडयांनी होणार आहे. पक्ष्यांना रस्त्यावर खाद्य दिले जाऊ शकत नाही असे कोर्टाने म्हटल्याचे समजते आहे. पक्ष्यांना खाद्य घालणाऱ्यांवर स्वच्छतेची जबाबदारी असेल असे हायकोर्टाने म्हटले आहे. नागरिकांकडून हरकती पालिकेने मागवून घ्याव्यात. त्यानंतर कंट्रोल फिडींगसाठी परवानगी देता येईल का याचा निर्णय मुंबई महापालिकेने घ्यावा.
मोठी बातमी! नागरिकांचं आरोग्य महत्वाचं; हायकोर्टाकडून कबुतरांना अन्न, पाणी देण्यास बंदी कायम
कबुतरखान्याच्या वादाला धार्मिक वळण
दादरमधील कबुतरखान्यावरुन जोरदार वाद निर्माण झाला आहे. लोकप्रिय असलेला हा कबूतरखाना मुंबई पालिकेकडून बंद करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी कबूतरांना खायला घालण्याबाबत मुंबई हायकोर्टाने निकाल दिला. तसेच कबूतरांमुळे अनेकांना दम्याचा त्रास होत असल्यामुळे लोकांच्या आरोग्याला प्राधान्य देत कबूतर खाना बंद करण्यात आला आहे. कबूतरखानाच्या या वादाला आता धार्मिक वादाचे स्वरुप आले आहे. जैन समाजाच्या विरोधात मराठी एकीकरण समितीने आंदोलन पुकारले आहे.
मुंबई महापालिकेने या प्रकरणात आपली बाजू हायकोर्टात मांडली आहे. यावेळेस सकाळी ६ ते ८ दरम्यान खाद्य घालण्यास परवानगी देण्यासाठी विचाराधीन असल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे. २० तारखेपर्यंत तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाणार आहे. हायकोर्टाच्या सुनावणीनंतर आता जैन समाजाची बैठक सुरु झाली असल्याचे समजते आहे.
कबुतरखान्याच्या वादाला धार्मिक वळण; जैन समाजाच्या विरोधात मराठी एकीकरण समिती आक्रमक
नेमका विषय काय?
गेल्या काही दिवसांपासून दादरमधील कबुतरखाना हा अत्यंत चर्चेचा विषय ठरला आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कबुतरखान्यावर ताडपत्री घालून तो बंद केला होता. मात्र या निर्णयानंतर जैन समाज आक्रमक झाल्याचेआपल्याला पहायला मिळाले. त्यानंतर या प्रकरणात मुंबई हायकोर्टात दाद मागण्यात आली होती. त्यावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत हायकोर्टाने कबुतरखान्यावरील बंदी कायम ठेवली आहे. दरम्यान आज झालेल्या सुनावणीत देखील हायकोर्टाने यावर बंदी कायम ठेवली आहे.