चेहऱ्यावर वाढलेल्या डेड स्किनमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग निळ्या फुलांचा वापर करून बनवा होममेड फेस क्रीम
Collagen Night Gel: वय वाढल्यानंतर त्वचेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. चेहऱ्यावर काळे डाग, वांग, सुरकुत्या आणि इतर समस्या दिसून येतात. त्वचेमधील नैसर्गिक कोलेजन वाढत्या वयानुसार कमी होत जाते. ज्यामुळे चेहऱ्यावरील ग्लो कमी होतो. अकाली सुरकुत्या, फाईन लाईन्स आणि त्वचा सैल पडणे इत्यादी समस्या वाढू लागल्यानंतर बाजारातील महागड्या क्रीम आणि सिरमचा वापर केला जातो. तर काहीवेळा स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची गुणवत्ता सुधारली जाते. पण वारंवार महागड्या केमिकल ट्रीटमेंट करणे त्वचेसाठी अजिबात चांगले नाही. यामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागतात.(फोटो सौजन्य – AI)
तरुण आणि घट्ट त्वचा कायम ठेवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती उपाय करून पाहावेत.स्किन केअर रुटीनसोबतच आहारात बदल करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. महागड्या अँटीएजिंग क्रीम्स आणि कोलेजन बूस्टर्सचा वापर करण्याऐवजी गोकर्णाच्या फुलांपासून बनवलेली क्रीम त्वचेसाठी वापरावी. यामुळे चेहऱ्यावरील हरवलेला तेज पुन्हा येईल आणि त्वचा उजळदार दिसेल. आयुर्वेदातील सौंदर्य उपचारांचा आधार घेतल्यास त्वचेच्या समस्या हळूहळू कमी होतील. निळ्या फुलांची क्रीम रात्री झोपण्याआधी नियमित लावावी.
अळशीच्या बिया
गोकर्णाची फुले
कोरफड जेल
पाणी
बदाम तेल
गोकर्णाच्या फुलांचे जेल बनवण्यासाठी, पॅनमध्ये एक कप पाणी घेऊन त्यात अळशीच्या बिया घाला आणि ५ ते ७ मिनिटं शिजवून घ्या. जेल तयार झाल्यानंतर गरम असतानाच गाळून घ्यावे. अर्धा कप पाण्यात गोकर्णाची फुले टाकून पाण्याला उकळी काढा. पाण्याचा रंग गडद निळा होईपर्यंत पाणी उकळवून घ्या. मोठ्या वाटीमध्ये गोकर्णाच्या फुलांचा अर्क आणि जेल घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात कोरफड जेल आणि बदाम तेल, विटामिन ई कँप्सूल घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करा. क्रिमी मिश्रण तयार झाल्यानंतर काचेच्या डब्यात जेल भरून ठेवा.
रात्री झोपण्याआधी नियमित त्वचा पाण्याने स्वच्छ करून घ्या. त्यानंतर कोरडी करा. कोरडी करून झाल्यानंतर तयार केलेले जेल लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे त्वचेमधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते आणि चेहरा उजळदार दिसतो. गोकर्णाच्या फुलांपासून बनवलेल्या जेलचा नियमित वापर केल्यास सुरकुत्या, डेड स्किन आणि टॅनिंग कमी होण्यास मदत होईल आणि त्वचा चमकदार दिसेल.
Ans: अपराजिता फुलांचा वापर करून घरगुती जेल तयार करण्याच्या काही पद्धती प्रचलित आहेत. मात्र, त्यात कोणतेही घटक मिसळण्यापूर्वी स्वच्छता आणि त्वचेला अनुकूलता तपासणे आवश्यक आहे. तयार मिश्रण दीर्घकाळ साठवून ठेवू नये.
Ans: प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेगळा असतो. त्यामुळे कोणतेही नवीन जेल रोज वापरण्याआधी हाताच्या आतील बाजूस पॅच टेस्ट करा. खाज, लालसरपणा किंवा जळजळ झाल्यास वापर थांबवा.
Ans: नाही. घरगुती फेस क्रीममुळे त्वचेतील कोलेजन वाढते, असा ठोस पुरावा नाही. त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित सनस्क्रीन वापरणे महत्त्वाचे आहे.






