केसांची वाढ खुंटली आहे? मग 'हा' घरगुती उपाय करून केस करा मजबूत आणि घनदाट
सर्वच महिलांना मजबूत आणि घनदाट केस हवे असतात. केसांच्या निरोगी वाढीसाठी सतत काहींना काही उपाय केले जाते. कधी बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे शँम्पू लावले जातात तर कधी हेअर मास्क लावून केसांची काळजी घेतली जाते. मात्र केसांच्या मुळांना योग्य पोषण न मिळाल्यामुळे केस अतिशय कोरडे आणि निस्तेज होऊन तुटू लागतात.महिलांसह पुरुषांचे केस गळण्यामागे अनेक कारण आहेत. सतत केस गळल्यामुळे केसांमध्ये टक्कल पडेल की काय अशी भीती अनेकांच्या मनात असते. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर केमिकलयुक्त हानिकारक तेलांचा वापर करण्याऐवजी आहारात बदल करून केसांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. हानिकारक रसायन केसांमधील नैसर्गिक तेल आणि ओलावा कमी करून टाकतात. ज्यामुळे केसांची कितीही चांगली हेअर स्टाईल केली तरीसुद्धा केस चांगले दिसत नाहीत.(फोटो सौजन्य – istock)
केसांच्या निरोगी वाढीसाठी केसांवर हानिकारक रसायनाचा वापर करण्याऐवजी आहारात पौष्टिक आणि गुणकारी पदार्थांचे सेवन करावे. केसांना आतून पोषण देणे जास्त आवश्यक आहे. बाहेरून पोषण दिल्यामुळे केस फक्त सुंदर दिसतात. केसांची नैसर्गिक वाढ होत नाही. शरीरात निर्माण झालेल्या विटामिनच्या कमतरतेमुळे सुद्धा केस गळू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसांची खुंटलेली वाढ पुन्हा नव्याने होण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यास केसांची निरोगी वाढ होईल, यासोबतच केस सुंदर दिसतील.
केसांच्या निरोगी वाढीसाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी मसाल्यांच्या पाण्याचे सेवन करावे. हे मसाले केसांना मुळांपासून पोषण देतात. यासाठी कलोंजी, मेथी दाणे, धने, बडीशेप, जिरे आणि अळशी मोठ्या ग्लासात पाणी घेऊन भिजत ठेवा. रात्रभर भिजल्यानंतर सकाळी उठल्यानंतर पाणी गाळून उपाशी पोटी सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. यासोबतच तुमचे केस चमकदार आणि निरोगी राहतील. याशिवाय आयुर्वेदिक मसाल्यांपासून बनवलेले पाणी केसांच्या मुळांवरसुद्धा लावू शकता. यामुळे केसांची वाढ निरोगी होईल.
केसांमध्ये वाढलेला कोंडा कायमचा होईल नष्ट! शँम्पूमध्ये मिक्स करा ‘हे’ औषधी पाणी, केस होतील स्वच्छ
केसांची निगा राखण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. मेथी दाणे, कलोंजी, धणे, बडीशेप इत्यादी मसाल्यांचे सेवन केल्यामुळे केसांना अनेक फायदे होतात. यामध्ये आवश्यक पोषक तत्व आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ज्यामुळे केसांची वाढ होते. मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रथिने, निकोटिनिक ऍसिड आढळून येते. यामुळे केसांची मुळांना पोषण मिळते आणि टाळूवरील घाण स्वच्छ होते. केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी आयुर्वेदिक स्प्रेचा वापर करावा. बडीशेपमुळे केसांना विटामिन आणि खनिजे इतर पोषक घटक मिळतात.