केसांच्या वाढीसाठी दही,कापूर
जीवनशैलीमध्ये सातत्याने बदल होत आहेत. सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी येणाऱ्या ट्रेंडचा वापर दैनंदिन जीवनात केला जात आहे. याचा वाईट परिणाम आरोग्यावर दिसून आल्यानंतर शरीरसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, सतत बाहेरचे पदार्थ खाणे, अमली पदार्थांचे सेवन करणे, कधीही जेवणे इत्यादी अनेक गोष्टींमुळे आरोग्य बिघडून जात आहे. याचा सगळ्यात वाईट परिणाम त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर दिसून आला आहे. सतत केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. केसांच्या वाढीसाठी केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे केसांची वाढ चांगली होते. आज आम्ही तुम्हाला केसांची गुणवत्ता वाढवण्यासाठी कापूरचा वापर कसा करावा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
साहित्य: कापूर, दही
हे देखील वाचा: गुडघे आणि हातांचे कोपरे काळे झाले आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय करून घालवा काळेपणा
केसांच्या मजबूत वाढीसाठी कापूर आणि दही अतिशय प्रभावी आहे. केसांना कापूर आणि दही लावल्यामुळे केसांची वाढ झपाट्याने होण्यास मदत होते. तसेच कोरडे झालेले केस पुन्हा एकदा मऊ होतात. केसांना कापूर लावल्यामुळे पोषण मिळते. कापूर वापरून तयार केलेला हेअर मास्क आठवड्यातून एकदा केसांना लावल्यास केसांची वाढ चांगली होईल.
हे देखील वाचा: केसांच्या सर्व समस्यांवर प्रभावी उपाय कोरियन हेड स्पा, जाणून घ्या स्पा करण्याची सोपी पद्धत
सतत केस गळून केसांची वाढ थांबली असेल किंवा केस कोरडे झाले असतील तर केसांसाठी कापूर तेल नियमित किंवा आठवड्यातून एकदा किंवा दोनदा लावा. कापूर तेल बनवण्यासाठी सर्वप्रथम अर्धा वाटी खोबरेल तेलात कापूरचे दोन तुकडे टाकून रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळीपर्यंत तेलातील कापूर वितळून जाईल. तयार केलेले तेल तुम्ही कधीही केसांना लावू शकता.