
ब्रश करूनसुद्धा तोंडाला दुर्गंधीचा घाण वास येतो? 'हे' उपाय केल्यास निघून जाईल तोंडाची दुर्गंधी
तोंडातून कायमच दुर्गंधीचा वास का येतो?
डिटॉक्स पेय पिण्याचे फायदे?
दात आणि हिरड्या स्वच्छ ठेवण्यासाठी उपाय?
तोंडातून दुर्गंधी येणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. बऱ्याचदा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर अन्नाचे बारीक कण दातांमध्ये तसेच साचून राहतात. दातांमध्ये साचून राहिलेले अन्नपदार्थांचे कण कुजल्यानंतर दात खराब होण्यासोबतच तोंडातून घाणीचा वास सुद्धा येतो. अनेकांना दिवसभरात दोन तीन वेळा ब्रश करण्याची सवय असते. पण ब्रश करून सुद्धा तोंडातून दुर्गंधीचा वास कायमच येतो. तोंडातून येणारा घाणेरडा वास जिभेवर साचलेला बॅक्टेरियाचा थर, हिरड्यांचे आजार किंवा तोंड कोरड पडल्यामुळे येतो. याशिवाय वारंवार उद्भवणाऱ्या अपचनाच्या समस्यांमुळे तोंडातून घाणीचा वास येतो. अपचन, किंवा मधुमेह, किडनी आणि लिव्हरसंबंधित गंभीर आजार झाल्यानंतर तोंडातून वास येतो. (फोटो सौजन्य – istock)
तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे बोलताना किंवा हसताना लाजिरवण्यासारखे वाटते. तर काहीवेळा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. तोंडातून येणारी केवळ बाहेरूनच नाहीतर आतून दूर होणे सुद्धा आवश्यक आहे. अन्यथा शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ शकते. हिरड्या कायमच मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी दातांचे आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास तोंडाची दुर्गंधी कायमची नष्ट होईल आणि तुम्ही फ्रेश राहाल. नैसर्गिक पदार्थांचा वापर करून तोंड स्वच्छ ठेवावे.
जेवण बनवताना आलं आणि लवंगचा वापर केला जातो. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीर स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. लवंगमध्ये ‘युजेनॉल’ नावाचे शक्तिशाली संयुग आढळून येते, ज्यामुळे तोंडात येणाऱ्या घाणीच्या वासापासून सुटका मिळते. तोंडात वाढलेले बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी लवंगाचे सेवन करावे. तवा गरम करून त्यावर लवंग भाजून ठेवाव्यात. भाजलेल्या लवंग नियमित चघळल्यास तोंडात वाढलेली दुर्गंधी नष्ट होईल आणि तुमचे दात स्वच्छ होतील. तसेच आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरतात. एक ग्लास कोमट पाण्यात आल्याचा रस मिक्स करून प्यायल्यास पोटात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाईल आणि तोंडाचे आरोग्य सुद्धा सुधारेल.
पोटात बिघाड झाल्यानंतर तोंडातून दुर्गंधीचा घाण वास येतो. अशावेळी बडीशेप खावी. मुखशुद्धी करण्यासाठी बडीशेप खाणे फायद्याचे मानले जाते. हा पदार्थ लाळ ग्रंथींना सक्रिय करतो आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो. जेवणानंतर नियमित एक चमचा भाजलेली बडीशेप खाल्ल्यास खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतील आणि पोटाचे आरोग्य सुधारेल. जेष्ठमधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे तोंडात जमा झालेले हानिकारक विषाणू नष्ट होऊन हिरड्या स्वच्छ होतात. घसा व तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी बारीक काडी जेष्ठमध चावून खावे.
आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या घाणीचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर पुदिना, काकडी आणि लिंबाच्या रसाचा वापर करून बनवलेले डिटॉक्स ड्रिंक प्यावे. यामुळे पोटात जमा झालेली सर्व घाण बाहेर पडून जाते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. पुदिन्याच्या पानांमध्ये ‘क्लोरोफिल’ नावाचा नैसर्गिक दुर्गंधीनाशक घटक आढळून येतो, ज्यामुळे तोंडातील घाणीचा वास नष्ट होण्यास मदत होते. तोंडातील पीएच पातळी संतुलित ठेवण्यासाठी आणि दुर्गंधीपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी डिटॉक्स पेयांचे सेवन करावे.
Ans: भरपूर पाणी प्या, जेणेकरून तोंड कोरडे पडणार नाही.
Ans: रोज दोनदा ब्रश करा, फ्लॉस करा आणि जीभ स्वच्छ करा.
Ans: तोंड कोरडे पडणे , जिभेवर आणि दातांवर बॅक्टेरिया जमा होणे