कोरियन हेड स्पा कसा केला जातो?
भारतासह इतर सर्वच देशांमध्ये कोरियन स्किन केअर आणि हेअर केअर खुप प्रसिद्ध झालं आहे. सर्वच महिलांना कोरियन महिलांप्रमाणे सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी महिला अनेक वेगवेगळे उपाय करून पाहतात. पण हे उपाय केल्यानंतर सुद्धा त्वचा आणि केसांवर काहीच फरक दिसून येत नाही. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी केस स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. तसेच कोरियन महिलांप्रमाणे तुम्ही सुद्धा घरगुती उपाय करून केसांचे सौदंर्य वाढवू शकता.
तुम्हाला सुद्धा कोरियन महिलांप्रमाणे सुंदर आणि चमकदार केस हवे असतील तर कोरियन हेअर स्पा नक्की ट्राय करून पहा. हा हेअर स्पा केल्यामुळे केसांमधील कोंडा कमी होऊन केस स्वच्छ आणि मजबूत होण्यास मदत होईल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोरियन हेड स्पा म्हणजे काय? कोरियन हेड स्पा कशा पद्धतीने केला जातो? जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: वयाच्या पंचवीशीत चेहऱ्यावर सुरकुत्या आहेत ? मग नियमित करा ‘या’ गोष्टी, त्वचा राहील तरुण
केसांच्या मुळांची काळजी घेण्यासाठी कोरियन हेअर स्पा केला जातो. यामुळे कोंडा कमी होऊन केसांची मूळ स्वच्छ होतात. केसांच्या मजबूत आणि घनदाट वाढीसाठी कोरियन हेअर स्पा करू शकता. कोरियन हेअर स्पा करताना केसांच्या मुळांची खोलवर स्वच्छता करणे, मसाज करणे, स्कॅल्पला मॉइश्चराईज करणे इत्यादी अनेक वेगवेगळे उपचार केले जातात.
कोरियन हेड स्पा केल्यामुळे केसांमधील धूळ, माती आणि चिकटपणा कमी होतो. केसांमध्ये चिकटपणा वाढल्यामुळे केसांची मुळांची वाढ होत नाही. तसेच केसांच्या मुळांचे आरोग्य बिघडून जाऊन केस खराब होऊन जातात. त्यामुळे कोरियन हेड स्पा केल्यास केसांमधील घाण स्वच्छ होऊन केस चांगले दिसतात. कोरियन हेड स्पा करताना ग्रीन टी, मगवॉर्ट आणि जिनसेंग इत्यादी हर्बल पदार्थांचा वापर केला जातो.
हे देखील वाचा: दांडिया खेळल्यानंतर घाम येतो? मग ‘हे’ प्रॉडक्ट वापरून करा वॉटरप्रूफ मेकअपबेस
कोरियन हेड स्पा केल्यामुळे केसांची मूळ स्वच्छ होतात. तसेच केसांमधील अतिरिक्त तेल काढून टाकले जाते. त्यानंतर केसांच्या मुळांना स्कॅल्प मसाज दिला जातो, ज्यामुळे केसांमधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. त्यानंतर मसाजमध्ये, एक्यूप्रेशरद्वारे स्ट्रेस दूर केला जातो. केसांची मूळ पाहून हायड्रेटिंग मास्क, सीरम, तेल इत्यादी प्रॉडक्ट लावले जातात. हेअर प्रॉडक्ट्समध्ये जिनसेंग, ग्रीन टी आणि इतर हर्बल गुणधर्म असलेल्या प्रॉडक्टचा वापर केला जातो.