मेथी दाणे आणि धणे पावडरच्या पाण्याचा उत्तम उपयोग
मेथी दाणे आणि धणे भारतात मसाले म्हणून वापरली जाते. यामध्ये खनिजे, जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि अँटीइन्फ्लेमेटरी असे महत्त्वाचे गुणधर्म असतात. यामुळेच मेथी आणि कोथिंबीर हे आरोग्यासाठी वरदान मानले जाते. वजन कमी करण्यासाठी लोक मेथी दाणे आणि धण्याचे पेय देखील पितात, परंतु पेयामध्ये फक्त मेथी दाणे आणि धणे टाकले पाहिजे असे नाही.
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मेथी दाणे आणि धणे यांची पावडर बनवून ते कोमट पाण्यात मिसळून रोज रात्री प्यावे. मेथी-धने पावडरचे अनेक आरोग्य फायदे आहेत. धणे-मेथीच्या बियांच्या पावडरचे पाणी पोटासाठी आणि पचनासाठी सर्वात फायदेशीर आहे. मेथी दाणे आणि धणे पावडर आरोग्याच्या दृष्टीने किती फायदेशीर आहे? याबाबत आपण अधिक माहिती या लेखातून आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांच्याकडून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
वजन कमी करण्यासाठी उत्तम
वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय
आज प्रत्येकजण वाढत्या वजनाने हैराण झालेला दिसतो. लठ्ठपणा ही लोकांमध्ये एक सामान्य समस्या बनली आहे. त्यामुळे लोक वर्कआऊटसोबत वजन कमी करण्याचे औषध वापरत आहेत. जर तुम्ही लठ्ठपणाने त्रस्त असाल आणि वजन कमी करायचे असेल तर धने-मेथीच्या बियांची पावडर उत्तम आहे. यासाठी कोमट पाण्यात धणे आणि मेथीच्या बियांची पावडर मिसळून रोज रात्री प्यावे. यामुळे शरीरातील सर्व चरबी वितळेल
रोज सकाळी उपाशी पोटी प्या मेथीचे पाणी, होतील ‘हे’ जबदस्त फायदे
बद्धकोष्ठतेपासून सुटका
बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास करा उपाय
पचनाचा त्रासही खूप असह्य आहे, सध्या अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागतो आणि अन्न पचण्याच्या असमर्थतेमुळे बद्धकोष्ठतेची समस्या सुरू होते. बद्धकोष्ठतेसोबतच गॅसही होऊ लागतो. बद्धकोष्ठतेसारख्या पोटाच्या गंभीर समस्यांनी त्रस्त असलेल्यांनी कोमट पाण्यात धणे आणि मेथीच्या बियांचे चूर्ण टाकून प्यावे, मग सकाळी शौचाला वा मलत्याग होण्यास कोणतीही अडचण येणार नाही. कारण धणे-मेथीच्या बियांची पावडर आतड्यांची प्रक्रिया सुलभ करते
बॉडी डिटॉक्स करण्यासाठी
शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करायचे असल्यास धणे-मेथी दाण्याचे पाणी
आता लोक निरोगी राहण्यासाठी बॉडी डिटॉक्सदेखील करतात. यासाठी लोक वेगवेगळी आणि केमिकलयुक्त पेये पितात, पण जर तुम्हाला शरीर नैसर्गिकरित्या आतून निरोगी बनवायचे असेल, तर धणे आणि मेथीच्या बियांचे चूर्ण असलेले पाणी हा उत्तम पर्याय आहे. धने आणि मेथीच्या बियांच्या पावडरने शरीरात साचलेली अशुद्धता सहज बाहेर पडू लागते. शरीरातील विषारी पदार्थ शंभर आजारांना जन्म देतात, त्यामुळे ते काढून टाकण्यासाठी या पाण्याचा वापर नक्की करावा
ब्लड शुगर नियंत्रणासाठी
रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी करा वापर
मधुमेहाची समस्या सामान्य झाली आहे आणि त्याचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचबरोबर शरीरातील साखरेची पातळी वाढल्याने लोक मधुमेहाने ग्रस्त होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या रक्तातील साखरेची पातळी राखली पाहिजे. अशा स्थितीत रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी तुम्ही धणे-मेथीच्या बियांची पावडरही पिऊ शकता. धणे आणि मेथी दाण्याची पावडर पाण्यात मिक्स करून प्यायल्याने रक्तात साखर जमा होत नाही, त्यामुळे मधुमेह कमी होण्यास मदत मिळते आणि नियंत्रितही राहतो
Weight Loss साठी मेथीचं पाणी पिताय का? व्हा सावध नाहीतर होतील गंभीर परिणाम
उत्तम मेटाबॉलिज्म
मेटाबॉलिज्म वाढविण्यासाठी
चयापचय म्हणजे मजबूत पाचक प्रणाली. जर तुम्हाला तुमची पचनक्रिया मजबूत करायची असेल, तर दररोज रात्री धणे-मेथीच्या बियांची पावडर असलेले पेय प्या. धणे-मेथीच्या बियांच्या पावडरमध्ये फायबर असते, जे मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करते. चयापचय मजबूत करून, वजन देखील कमी होते. मेथीचे दाणे धण्याच्या तुलनेत अधिक उष्ण असतात. याचा नक्की वापर करावा
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.