फोटो सौजन्य - Social Media
कुरळ्या केसांचं सौंदर्य त्यांच्या टेक्श्चरमध्ये दडलं असतं. पण खरं सांगायचं तर कुरळे केस व्यवस्थित मॅनेज करणं हे अनेकांसाठी डोकेदुखी ठरतं. हे केस बहुतेक वेळा कोरडे, फ्रिझी आणि गाठी पडणारे असतात. त्यामुळे त्यांना जास्त काळजी, डीप मॉइश्चरायझिंग आणि पौष्टिक ट्रीटमेंटची गरज असते. अशा वेळी ओव्हरनाईट हेअर मास्क हा एक उत्तम उपाय ठरतो. हे मास्क रात्रीभर केसांना पोषण देतात आणि सकाळपर्यंत केस मऊ, चमकदार व नीटनेटके दिसतात. चला तर जाणून घेऊया काही खास मास्क:
नारळ तेल आणि ऍलोव्हेरा मास्क
दोन चमचे नारळ तेलात दोन चमचे ताजं ऍलोव्हेरा जेल मिसळा. हा मास्क केसांना ओलावा देतो, टाळू शांत ठेवतो आणि केसांची खरखरीतपणा कमी करतो.
दही आणि मधाचा हायड्रेटिंग मास्क
दोन चमचे दह्यात एक चमचा मध घाला. दही केसांना मऊ करते आणि गाठी सुटायला मदत करते, तर मध नैसर्गिक चमक आणतो.
केळं आणि ऑलिव्ह ऑइल मास्क
एक पिकलेलं केळं मॅश करून त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑइल मिसळा. केळं केसांना स्मूद करतं आणि ऑलिव्ह ऑइल खोलवरून मॉइश्चर देतं.
मेथी आणि दही मास्क
एक चमचा मेथी रातभर भिजवून सकाळी वाटा आणि दोन चमचे दही मिसळा. हा मास्क केस गळणे कमी करतो, टाळू मजबूत बनवतो आणि स्काल्प हेल्थ सुधारतो.
कॅस्टर ऑइल आणि जोजोबा ऑइल मास्क
प्रत्येकी एक चमचा कॅस्टर आणि जोजोबा ऑइल एकत्र करून केसांच्या मुळांपासून शेवटपर्यंत लावा. हे केसांना पोषण देऊन कर्ल्सला उडत्या आणि बाउन्सी बनवतात.
ऍवोकॅडो आणि कोकोनट मिल्क मास्क
एक पिकलेलं ऍवोकॅडो मॅश करून त्यात दोन चमचे नारळ दूध मिसळा. हा मास्क केसांचा कोरडेपणा घालवतो आणि केस नेचरल स्मूद आणि ग्लोइंग करतो.
वापरण्याची पद्धत
रात्री हलक्या हाताने हे मास्क केसांवर लावा. मग केसांना शॉवर कॅप किंवा मऊ कापडी स्कार्फने झाका. सकाळी सौम्य शॅम्पूने केस धुवा. आठवड्यातून १-२ वेळा हे मास्क वापरले तर उत्तम परिणाम मिळतात.
कुरळे केस सुंदर ठेवायचे असतील तर नेचरल आणि डीप पोषण देणारे हे मास्क नक्की वापरा. केस फ्रिझ-फ्री, मऊ आणि आकर्षक दिसतील.