(फोटो सौजन्य: istock)
आपल्या जन्मापासूनच आपल्या शरीरावर काही डाग, खुणा किंवा काही अशा गोष्टी जन्मतःच मिळालेल्या असतात ज्या आपल्याला अजिबात आवडत नाहीत. यातीलच एक म्हणजे चामखीळ. अनेकांना लहानपणी किंवा वय वाढल्यानंतर वयानुसार त्यांच्या शरीरात हे विकसित होऊ लागतात जे दिसायला अजिबात चांगले दिसत नाहीत. हे चामखीळ शरीराच्या कोणत्याही भागावर येऊ शकतात, बऱ्याचदा ते चेहऱ्यावरही दिसून येतात ज्यामुळे आपल्या चेहऱ्याचा संपूर्ण लूक खराब होतो. यांना चेहऱ्यावरून काढण्यासाठी अनेकजण लेसरचा वापर करतात ज्यात फार वेदना होतात. ही प्रक्रिया वेदनादायक आणि महाग दोन्ही आहे.
टाळूवरील त्वचा वारंवार कोरडी पडते? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा करा वापर, स्काल्प होतील स्वच्छ
पण आज आम्ही तुम्हाला शरीरावरुन चामखीळ दूर करण्यासाठीचा एक सोपा, सहज, कमी खर्चिक आणि कमी वेदनादायी पर्याय सांगणार आहोत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. नैसर्गिकरित्या घरगुती पदार्थांचा वापर करून आपण ही प्रक्रिया करू शकतो ज्यात कोणताही खर्च किंवा वेदना होणार नाहीत. याचा वापर केलात तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या शरीरावरील चामखीळ हे कोणत्याही वेदनेशिवाय गळून पडले आहेत. चला तर मग या उपायाचा कसा वापर करायचा त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
साहित्य
बनवण्याची पद्धत
हा उपाय कसा फायदेशीर आहे?
हळदीमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म चामखीळातील संसर्ग आणि बॅक्टेरिया दूर करतात. बेकिंग सोडा त्वचेतील अतिरिक्त ओलावा शोषून घेतो, ज्यामुळे चामखीळ कोरडी होतात. चामखीळावर चुना लावल्याने त्याची मुळे कमकुवत होऊ शकतात. परंतु चुना डायरेक्ट त्वचेवर कधीही लावू नये, त्यामुळे त्वचा खराब होऊ शकते.
चामखीळ काढणे महत्त्वाचे आहे का?
HPV नावाच्या विषाणूमुळे चामखीळ होते. हे विषाणू त्वचेच्या संपर्कात आल्याने पसरतात. चामखीळ पसरू शकतात, मोठे होऊ शकतात किंवा वेदना देऊ शकतात, त्यामुळे त्वचारोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यावर उपचार करणे आवश्यक आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.