फोटो सौजन्य - Social Media
आपल्या दैनंदिन जीवनात प्लॅस्टिक खुर्च्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. घर असो, शाळा, ऑफिस किंवा एखादा मोठा कार्यक्रम, सर्वात स्वस्त, हलक्या आणि सोप्या खुर्च्या म्हणजे प्लॅस्टिकच्या खुर्च्या. पण तुम्ही कधी लक्ष दिलंय का, या खुर्च्यांच्या मागच्या भागात नेहमी काही Hole असतात. अनेकांना वाटतं की हा फक्त डिझाईनचा भाग आहे. पण प्रत्यक्षात या मागे अनेक वैज्ञानिक आणि उपयोगी कारणं दडलेली असतात. चला तर जाणून घेऊया ही Hole का असतात?
खुर्च्या वेगळ्या करण्यासाठी सोय
प्लॅस्टिक खुर्च्या एकावर एक ठेवता येतात. पण त्यावेळी मध्ये हवा अडकते आणि खुर्च्या चिकटून बसतात. त्यामुळे वेगळ्या करणे कठीण होते. मागचं हे Hole हवेचा मार्ग मोकळा करतं आणि खुर्च्या सहज वेगळ्या होतात.
उत्पादन प्रक्रिया सोपी करणे
प्लॅस्टिक खुर्च्या साच्यांमध्ये तयार केल्या जातात. जर Hole नसेल, तर खुर्ची साच्यातून बाहेर काढताना अडचण येऊ शकते. Hole असल्याने खुर्ची सहज बाहेर निघते आणि उत्पादन वेगवान व सुरक्षित होते.
वजन आणि खर्च कमी करणे
छोटंसं Hole दिसायला किरकोळ असलं तरी त्यामुळे प्लॅस्टिकचा थोडा वापर कमी होतो. लाखो खुर्च्या बनवल्या जातात तेव्हा ही बचत मोठ्या प्रमाणात होते. त्याचबरोबर खुर्ची हलकी असल्याने सहज उचलता येते.
बसताना आराम मिळणे
गरमीमध्ये किंवा जास्त वेळ बसल्यावर पाठीला घाम येतो. खुर्चीच्या Hole मुळे हवेशीरपणा राहतो आणि बसणं आरामदायी वाटतं.
पाणी न थांबता वाहून जाणं
जर खुर्चीवर पाणी पडलं तर Hole मुळे ते लगेच खाली वाहून जातं. पाणी साचत नाही आणि खुर्ची जास्त टिकाऊ ठरते.
म्हणजेच, प्लॅस्टिक खुर्चीवरील Hole हे फक्त डिझाईनसाठी नप्लॅस्टिक खुर्चीवरील भोक फक्त डिझाईनसाठी नसून त्यामागे वैज्ञानिक आणि उपयोगी कारणं दडलेली असतात. हे Hole खुर्ची हलकी, आरामदायी, टिकाऊ आणि वापरण्यास सोपी बनवतं. सून, उत्पादन, वापर आणि देखभालीसाठी खूप महत्त्वाचं असतं.