(फोटो सौजन्य – Pinterest)
भारतातील अनोख मंदिर जेथील शिवलिंगाची संख्या नेहमी बदलत राहते, विज्ञानालाही ठाऊक नाही यामागच रहस्य
बँकॉकमध्ये उभे राहिले पाकिस्तानचे शहर
हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ‘धुरंधर’मधील अनेक पाकिस्तानसदृश दृश्यांचे शूटिंग थेट पाकिस्तानमध्ये न होता थायलंडची राजधानी बँकॉक येथे झाले आहे. पाकिस्तानमधील शहरी भाग, गजबजलेले रस्ते आणि गुप्त अड्डे दाखवण्यासाठी बँकॉकची निवड करण्यात आली. मेकर्सना केवळ व्हीएफएक्सद्वारे बनवलेले कृत्रिम शहर दाखवायचे नव्हते, तर खऱ्या, गर्दीने भरलेल्या आणि जिवंत शहराचा अनुभव प्रेक्षकांना द्यायचा होता. त्यामुळे बँकॉक हे ठिकाण त्यांच्या दृष्टीने योग्य ठरले.
पंजाबमध्ये दिसली पाकिस्तानच्या ग्रामीण भागाची झलक
पाकिस्तानचा ग्रामीण भाग अधिक वास्तवदर्शी भासावा यासाठी चित्रपटाचे काही सीन पंजाबमध्ये चित्रीत करण्यात आले. विशेषतः पाकिस्तानच्या गावांसारखे वातावरण दाखवण्यासाठी लुधियाना जिल्ह्यातील खेड़ा गाव निवडण्यात आले. या भागाची रचना, रस्ते आणि परिसर कराची व लयारीसारखे भासतात, त्यामुळे मेकर्ससाठी हे लोकेशन अतिशय परफेक्ट ठरले.
मुंबईतही झाले महत्त्वाचे शूटिंग
बँकॉक आणि पंजाबव्यतिरिक्त ‘धुरंधर’चे काही महत्त्वाचे सीन मुंबईतही चित्रीत झाले आहेत. चित्रपटातील थरारक चेस सीन मुंबईजवळील डोंबिवली–मानकोली नव्या पुलावर शूट करण्यात आला आहे. तसेच, दमदार फाइट सीनसाठी फिल्म सिटीतील जंगल परिसर वापरण्यात आला आहे.
एका रात्रीत उभारली गेली अशी भारतातील रहस्यमय मंदिरे, आजही भाविकांना चकित करतात यांच्या कथा
याशिवाय, काही इनडोअर सीन, गाणी आणि क्लोज-अप शॉट्ससाठी ऐतिहासिक फिल्मिस्तान स्टुडिओचा वापर करण्यात आला. तर काही महत्त्वाचे सीन मड आयलंड येथे शूट झाले आहेत. विशेष म्हणजे, चित्रपटातील एक आकर्षक डान्स सीन विले पार्ले येथील गोल्डन टोबॅको फॅक्टरीमध्ये चित्रीत करण्यात आला आहे. एकूणच, ‘धुरंधर’साठी मेकर्सनी वेगवेगळ्या शहरांचा कल्पकतेने वापर करून पाकिस्तानसारखे वास्तवदर्शी वातावरण उभे केले आहे. त्यामुळेच हा चित्रपट प्रेक्षकांना अधिक खरा आणि प्रभावी वाटतो.






