Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aloo Kachalu Recipe: बिहारचा फेमस चटपटीत स्ट्रीट फूड आता तुमच्या घरी; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट

बिहार हे एक असे राज्य आहे जे आपल्या उत्कृष्ट स्ट्रीट फूडसाठी ओळखले जाते. यातीलच एक लोकप्रिय स्ट्रीट फूड म्हणजे आलू कचालू. उन्हाळ्यात याचे भरपूर सेवन केले जाते आणि हा पदार्थ बटाटे, मसाले आणि चटण्यांपासून तयार होतो.

  • By नुपूर भगत
Updated On: May 23, 2025 | 11:51 AM
Aloo Kachalu Recipe: बिहारचा फेमस चटपटीत स्ट्रीट फूड आता तुमच्या घरी; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट

Aloo Kachalu Recipe: बिहारचा फेमस चटपटीत स्ट्रीट फूड आता तुमच्या घरी; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट

Follow Us
Follow Us:

भारताच्या विविध भागांत विविध पदार्थ लोकप्रिय आहेत. प्रत्येक पदार्थाची आपली अशी वेगळी ओळख आणि चव… अशात आज आम्ही तुमच्यासाठी बिहारच्या फेमस स्ट्रीट फूडची रेसिपी घेऊन आलो आहोत. हा पदार्थ म्हणजे आलू कचालू! हा एक चटपटीत नाश्त्याला प्रकार आहे जो अनेक वर्षांपासून बिहारच्या रस्त्यांवर विकला जातोय. याची चव इतकी अप्रतिम आहे की आता शहरातही अनेक ठिकाणी हा पदार्थ उपलब्ध असतो. बटाटा आणि चटण्यांच्या संमिश्रणाने हा पदार्थ तयार केला जातो.

भाज्या, मसालेदार सूप आणि नूडल्सचे संमिश्र… तिबेटियन Thukpa कधी ट्राय केलाय का? जाणून घ्या रेसिपी

उन्हाळ्यात याचे अधिक सेवन केले जाते. उकडलेले बटाटे, मसाले, चिंचगुळाची चटणी आणि लिंबाचा रस यामुळे याला एकदम भन्नाट चव येते. संध्याकाळच्या नाश्त्याला काही नवीन आणि टेस्टी, चटपटीत असा पदार्थ शोधत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. आलू कचालू घरीदेखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने बनवला जाऊ शकतो आणि यासाठी फार वेळेची आणि साहित्याचीही गरज भासत नाही. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • बटाटे (उकडून सोललेले) – 3 मध्यम
  • चिंच-गुळाची चटणी – 3 टेबलस्पून
  • हिरवी चटणी (कोथिंबीर-पुदिन्याची) – 2 टेबलस्पून (ऐच्छिक)
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • भाजलेले जिरे पावडर – 1 टीस्पून
  • चाट मसाला – 1 टीस्पून
  • काळं मीठ – ½ टीस्पून
  • साधं मीठ – चवीनुसार
  • लिंबाचा रस – 1 टेबलस्पून
  • कांदा बारीक चिरून – 1 (ऐच्छिक)
  • कोथिंबीर बारीक चिरून – सजावटीसाठी
नेहमीच भाजी काय बनवावी सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मसालेदार बटाट्याची भाजी

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम सर्वप्रथम उकडलेले बटाटे मध्यम आकारात फोडींमध्ये कापा
  • एका मोठ्या बाऊलमध्ये बटाट्याच्या फोडी घ्या
  • त्यात चिंच-गुळाची चटणी, हिरवी चटणी, लाल तिखट, जिरे पावडर, चाट मसाला, काळं मीठ, साधं मीठ आणि लिंबाचा रस घाला
  • हे सर्व घटक एकत्र मिक्स करा. बटाट्याच्या फोडींवर सगळे मसाले नीट मिसळून घ्या
  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यात बारीक चिरलेला कांदा देखील घालू शकता
  • शेवटी यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि चटपटीत आलू कचालू खाण्यासाठी सर्व्ह करा
टीप:
  • चिंच-गुळाची चटणी आणि हिरवी चटणी आधीपासून तयार असली तर ही डिश ५ मिनिटांत तयार होते
  • जास्त चटपटीत हवी असेल तर थोडं जास्त चाट मसाला आणि लिंबाचा रस घाला
  • थंडगार सर्व्ह केल्यास चव आणखीनच वाढते

Web Title: Bihar famous street aloo kachalu recipe in marathi note down the ingredients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 11:51 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन
1

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
2

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’
3

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी
4

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.