Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात वाढतोय बर्ड फ्लूचा धोका, माणसांमध्ये कसा पसरत आहे संसर्ग; जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

Bird Flu : बर्ड फ्लूचे संक्रमण वाढत असल्याने राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा गंभीर आजार नसला तरी याच्या लक्षणांकडे विशेष लक्ष द्यायला हवे जेणेकरुन वेळीच यावर उपाययोजना करता येतील.

  • By नुपूर भगत
Updated On: May 10, 2026 | 08:15 PM
महाराष्ट्रात वाढतोय बर्ड फ्लूचा धोका, माणसांमध्ये कसा पसरत आहे संसर्ग; जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

महाराष्ट्रात वाढतोय बर्ड फ्लूचा धोका, माणसांमध्ये कसा पसरत आहे संसर्ग; जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रातील काही भागांमध्ये बर्ड फ्लूचा धोका वाढल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
  • संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कातून H5N1 विषाणू माणसांपर्यंत पोहोचण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
  • ताप, खोकला, घसा खवखवणे आणि श्वास घेण्यास त्रास ही याची सुरुवातीची लक्षणे मानली जात आहेत.
महाराष्ट्रातील काही भागांमध्ये बर्ड फ्लूचा (Avian Influenza) धोका वेगाने वाढत आहे ज्यामुळे आरोग्य अधिकारी आणि जनतेमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संक्रमित पक्षी आढळल्यानंतर राज्यात निगराणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढवण्यात आल्या आहेत. राज्याच्या काही भागांत H5N1 विषाणू आढळून आल्यानंतर काही महिन्यांतच आता बर्ड फ्लूचाही धोका वाढला आहे. अनेकांना असे वाटते की, बर्ड फ्लू हा एक सामान्य आणि दूरचा आजार आहे किवा तो फक्त कोंबड्या आणि पोल्ट्री फार्मपुरताच मर्यादित आहे पण असं नाहीये. आरोग्य तज्ञांच्या मते, खरी चिंता तेव्हा निर्माण होते जेव्हा माणसे संक्रमित पक्ष्यांच्या सभोवतालच्या संपर्कात येतात.

वर्ल्ड हेल्थ ऑरगनायजेशनच्या (WHO) मते, बर्ड फ्लूचे विषाणू प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये आढळून येत असले तरी H5N1 आजाराचा धोका माणसांमध्ये दिसून येतो. तथापि, अजूनपर्यंत माणसांकडून माणसाला झालेल्या संक्रमणाचा कोणताही महत्त्वपूर्ण पुरुवा मिळालेला नाहीये. तज्ञांच्या मते, यात घाबरण्याची गरज नाही पण याच्या लक्षणांकडे विशेष लक्ष द्यायला हवे जेणेकरुन जर आपल्या शरीरात याचे संक्रमण झालेच तर वेळीच यावर उपाययोजना करता येतील. चला याच्या सुरुवातीच्या लक्षणांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

कापलेलं केळं किती वेळात खायला हवं? काळं पडलेलं केळं खाणं सुरक्षित असतं का? जाणून घ्या सविस्तर

बर्ड फ्लूचा संसर्ग माणसांपर्यंत कसा पोहोचू शकतो?

बर्ड फ्लूचा धोका माणसांमध्ये सहज पसरु शकत नाही. H5N1 हा विषाणू माणसांमध्ये सातत्याने पसरत असल्याचा आजपर्यंत कोणताही पुरावा नाही. तज्ञांच्या मते, बर्ड फ्लूचे विषाणू अधिकतर वेळी कोंबड्या, बदके आणि इतर पाळीव पक्ष्यांमध्ये अधिकतर आढळून येतात. हा विषाणू प्रामुख्याने पक्ष्यांना होत असल्याने जर आपण अशा पक्ष्यांच्या सहवासात आलो तर माणसाला याचे संक्रमण होण्याचा धोका असतो. दूषित पृष्ठभागांना स्पर्श केल्याने किंवा पक्ष्यांची कत्तल केल्याने तो माणसांमध्ये पसरतो. माहितीनुसार, याचे विषाणू डोळे, नाक आणि तोंडावाटे मानवी शरीरात प्रवेश करतात. पोल्ट्री फार्ममध्ये असलेले संक्रमित थेंब किंवा धुळीचे कण याद्वारे श्वासावाटे शरीरात पसरण्याची शक्यता असते.

तज्ज्ञ या साथीच्या आजारावर लक्ष का ठेवून आहेत?

बर्ड फ्लूचा हा धोका वाढत असल्याने तज्ञ यावर लक्ष ठेवून आहेत. गेल्या काही वर्षांपासून याचे विषाणू आशिया, युरोप, आफ्रिका आणि अमेरिका खंडात पसरले आहेत. २०२४ मध्ये, अमेरिकेतील गायींमध्ये बर्ड फ्लूचे विषाणू आढळून आले होते. याचबरोबर त्यावेळी काही शेतमजुरांना याची लागण झाली होती. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, सध्या या आजाराचा धोका कमी आहे परंतु लक्ष आणि जलद निदान करणे आवश्यक आहे.

केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? केसांच्या वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा केळीच्या सालीचा वापर, केस होतील घनदाट

बर्ड फ्लूची लक्षणे?

  • जास्त ताप (सामान्यतः 38 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त)
  • सतत येणारा खोकला
  • घसा खवखवणे
  • वाहणारे नाक
  • श्वास घेण्यात अडचण येणे
  • डोकेदुखी होणे
  • स्नायू किंवा शरीर दुखणे
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Bird flu risk rises in maharashtra know h5n1 symptoms and warning signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Bird Flu News
  • Bird Flue
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
2

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
3

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!
4

दिवसभर रील्स पाहण्याचे व्यसन अन् फोन काढल्यावर चिडचिड? ‘या’ सोप्या टिप्सने कमी करा मुलांचा स्क्रीन टाईम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.