Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीत येण्यापूर्वी नितीन गडकरी 2 तास करतात योगाचा ‘हा’ प्रकार; आतड्यातून काढून टाकेल प्लास्टिकमय विषारी गॅस

Pranayama Benefits: दिल्लीची हवा खूपच प्रदूषित झाली आहे. त्यात प्लास्टिकचे कण आणि विषारी वायूंचे प्रमाण वाढले आहे. यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही दिल्लीत येण्यापूर्वी 2 तास प्राणायाम करतात.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 07, 2024 | 11:39 AM
प्रदूषणाचा शरीरावर परिणाम न होऊ देण्यासाठी योग्य योगा

प्रदूषणाचा शरीरावर परिणाम न होऊ देण्यासाठी योग्य योगा

Follow Us
Close
Follow Us:

दिल्लीची हवा इतकी खराब झाली आहे की भारत सरकारचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही इथे यायला घाबरतात. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ते म्हणाले की दिल्ली हे शहर असे आहे की मी दोन दिवस राहिलो तर मला संसर्ग होऊ शकतो.  इथलं प्रदूषण खूपच भयंकर असून प्रत्येक वेळी मी इथे यावं की नाही, याचा विचार करावा लागतो. तर हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, नितीन गडकरी म्हणाले की, येथे येण्यापूर्वी मला 2 तास प्राणायाम करावा लागतो. प्राणायाम हा योगाचा एक प्रकार आहे. जे फुफ्फुसांना मजबूत आणि स्वच्छ करते. परंतु हे फायदे मिळविण्यासाठी, ते करण्याचा योग्य मार्ग देखील माहीत असणे आवश्यक आहे.

प्रदूषित हवेमध्ये अनेक प्रकारचे हानिकारक वायू आणि कण असतात. ज्यामध्ये PM 10 आणि 2.5 सारखे विषारी वायू, नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन मोनोऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि मायक्रोप्लास्टिक कण असू शकतात. जे श्वसनमार्गापर्यंत पोहोचू शकतात आणि अ‍ॅलर्जी आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो. जाणून घेऊया प्राणायमचे अधिक फायदे (फोटो सौजन्य – Instagram/iStock) 

फुफ्फुस बनवा अधिक मजबूत

प्रदूषणापासून वाचण्यासाठी फुफ्फुस बनवा अधिक मजबूत

 

प्राणायाम हा योगाचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याचे अनेक प्रकार आहेत. भस्त्रिका प्राणायाम, नाडी शोधन प्राणायाम, कपालभाती, उज्जयी, भ्रामरी इत्यादी अतिशय शक्तिशाली प्राणायमाचे प्रकार आहेत जे  फुफ्फुसासाठी उत्तम व्यायाम आहेत. हे फुफ्फुस मजबूत करते आणि श्वसनमार्गाचे कार्य सुधारते. फुफ्फुस आणि आतडी स्वच्छ करण्याचा हा उत्तम नैसर्गिक उपाय आहे.

विषारी वायू बाहेर काढण्याचा उपाय

शरीरातील विषारी वायू बाहेर काढण्यासाठी उपाय

फुफ्फुसातून प्लास्टिक-विषारी वायूंसारखे प्रदूषित कण काढून टाकण्यासाठी भस्त्रिका प्राणायाम खूप फायदेशीर आहे. यामध्ये श्वास जोराने सोडला जातो. जे फुफ्फुस आणि श्वसनमार्गामध्ये उपस्थित हानिकारक कण काढून टाकण्यास मदत करते. रिसर्चगेटवर उपलब्ध असलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की ज्यांनी हे केले त्यांच्या श्वसन कार्यामध्ये वाढ झाली आहे

Yoga For Hypertension: औषधांशिवाय 5 योगासन ठरतील ‘गुणकारी’, हाय ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय

भस्त्रिका प्राणायमाची पद्धत 

कसे करावे भस्त्रिका प्राणायम

  • सर्वप्रथम आरामात क्रॉस पाय करून बसा
  • तुमची पाठ आणि मान सरळ ठेवा आणि तुमचे खांदे सरळ रेषेत ठेवा 
  • आता हळूहळू 10-12 खोल श्वास घ्या. यानंतर, पूर्ण श्वासाने फुफ्फुस वेगाने भरा
  • या दरम्यान तोंड बंद ठेवा आणि नाकानेच श्वास घ्या. नंतर एकाच वेळी त्वरीत आणि पूर्णपणे श्वास सोडा
  • ही प्रक्रिया सुमारे 30 सेकंदांसाठी करा

भस्त्रिका प्राणायमाचे फायदे 

  • फुफ्फुसाची क्षमता वाढेल
  • ऊर्जा पातळी वाढेल
  • तणाव आणि चिंता कमी होईल
  • पचन जलद होईल
  • रक्ताभिसरण वाढेल
  • शरीर डिटॉक्स होईल

भस्त्रिका प्राणायमाची योग्य वेळ आणि कोणी करू नये?

भस्त्रिका प्राणायमाची माहिती

भस्त्रिका प्राणायाम करण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी आहे. जेव्हा आजूबाजूला कोणाचाही आवाज नसतो आणि प्रदूषण कमी असते. आपण हे स्वच्छ हवेत केले पाहिजे. हा योग करताना पोट रिकामे ठेवणे चांगले.

भस्त्रिका प्राणायाम हा एक शक्तिशाली योग आहे, जो जलद परिणाम दर्शवतो. म्हणून, काही लोकांसाठी ते हानिकारकदेखील असू शकते. हा प्राणायाम गर्भधारणेदरम्यान किंवा उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार, फुफ्फुसाचे आजार, टीबी, पक्षाघात, अपस्मार, गॅस्ट्रिक अल्सर इत्यादी असल्यास करणे टाळा किंवा तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करा

कंबरदुखीने हैराण? 5 योगासन करतील चमत्कार, परिणामांसाठी करा नियमित

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Bjp leader nitin gadkari does pranayama 2 hours before landing in delhi know how to do bhastrika pranayama to clean lungs from pollution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2024 | 11:39 AM

Topics:  

  • Delhi Pollution
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन
1

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
2

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

Nitin Gadkari on Voter List : अखेर नितीन गडकरींनीही केलं मान्य; महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी; कॉंग्रेस नेत्यांकडून VIDEO शेअर
3

Nitin Gadkari on Voter List : अखेर नितीन गडकरींनीही केलं मान्य; महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी; कॉंग्रेस नेत्यांकडून VIDEO शेअर

वाहन चालकांसाठीआनंदवार्ता! आता केवळ 15 रुपयांत पास करता येणार टोल प्लाझा; नेमकं कसं ते एकदा वाचाच
4

वाहन चालकांसाठीआनंदवार्ता! आता केवळ 15 रुपयांत पास करता येणार टोल प्लाझा; नेमकं कसं ते एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.