हाडांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
जगभरात कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने अनेक रुग्ण त्रस्त आहेत. हा आजार झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. कॅन्सरचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या अंगावर काटा येतो. त्यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ नये म्हणून आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. हाडांसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार करणे आवश्यक आहे. शरीरातील कोणत्याही अवयवाला कॅन्सर होण्याची शक्यता असते. दीर्घकाळ निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी शरीरातील हाडे मजबूत आणि निरोगी असणे आवश्यक आहे. पण हाडांचा कॅन्सर झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. हाडांच्या कॅन्सरला ऑस्टियोसारकोमा असे म्हणतात.(फोटो सौजन्य – istock)
हाडांचा कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात अतिशय सामानय आणि साधी लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. पण वेळेवर या आजाराची लक्षणे ओळखून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे गरजेचे आहे. हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, सूज किंवा लहानशा दुखापतीमुळे फ्रॅक्चर होणे ही हाडांच्या कॅन्सरची लक्षणे असू शकतात. आज आम्ही तुम्हाला हाडांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? हाडे कायमच निरोगी राहण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
बऱ्याचदा हाडांमध्ये वाढलेल्या वेदनाकडे दुर्लक्ष केले जाते. पण हाडांच्या खोलवर वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. आराम केल्यानंतर सुद्धा हाडांमध्ये वेदना होत असतील दुर्लक्ष करू नये. असे केल्यामुळे हा आजार आणखीनच वाढून शरीर पोखरून टाकतो. हाडांमधील ट्यूमर वाढू लागल्यामुळे हाडांमध्ये वेदना होतात.
कॅन्सरचे प्रमुख लक्षण म्हणजे शरीराच्या कोणत्याही अवयवावर गाठ येणे. हाडांमध्ये झालेल्या गाठी हळूहळू वाढू लागल्यानंतर वेदना होण्यास सुरुवात होते. तसेच बऱ्याचदा उबदारपणा जाणवू लागतो. हाडांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरातील हाडे अतिशय कमकुवत होऊन जातात. कोणत्याही क्षणी लागल्यानंतर हाडे लगेच फ्रॅक्चर होतात. तसेच हळूहळू वजन कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
शरीरातील हाडे कायमच मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी आहारात दुग्धजन्य पदार्थ, पालक, लोणी, तीळ, तिळाचे तेल आणि इतर पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे हाडांना पोषण मिळते. हाडे कायमच मजबूत राहण्यासाठी हाडांमध्ये प्रोटीन असणे आवश्यक आहे. डाळी, मांस, चीज इत्यादी पदार्थ खावेत. हाडे बळकट होण्यासाठी वजन उचलणे, योगासने, चालणे इत्यादी सोपे व्यायाम करावे. तसेच सकाळी उठल्यानंतर गूळ आणि तिळाचे एकत्र सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात.
हाडांच्या कर्करोगाचे मुख्य प्रकार:
हाडांच्या कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार, विशेषतः लहान मुलांमध्ये आणि तरुण प्रौढांमध्ये आढळतो.लहान मुलांमध्ये आणि तरुण प्रौढांमध्ये आढळतो, विशेषतः हात, पाय आणि ओटीपोटात.
हाडांच्या कर्करोगाचे उपचार:
शस्त्रक्रिया (Surgery), रेडिएशन थेरपी (Radiation therapy), केमोथेरपी (Chemotherapy), लक्ष्यित थेरपी
हाडांच्या कर्करोगाची लक्षणे:
हाड किंवा सांध्यांमध्ये वेदना, विशेषत: रात्री जास्त वेदना.सूज किंवा गाठ येणे.हाड कमजोर होऊन फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. थकवा, वजन कमी होणे, भूक न लागणे.