Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑफिसला जाणाऱ्या महिलांमध्ये हाडांचं दुखणं वाढतंय, ‘या’ विटामिनच्या कमतरतेने हैराण

एका ठराविक वयानंतर महिलांमधील हाडांचं दुखणं असतंच, पण आता ऑफिसला जाणाऱ्या महिलांमध्ये याची अधिक वाढ असल्याचे दिसून येत आहे आणि याचे नक्की कारण काय आज आपण जाणून घेऊया

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 24, 2025 | 05:23 PM
महिलांमध्ये वाढतोय हाडांचा त्रास (फोटो सौजन्य - iStock)

महिलांमध्ये वाढतोय हाडांचा त्रास (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • २० ते ४० मधील महिलांना हाडांचं दुखणं
  • कोणते विटामिन कमी 
  • हाडांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी 
हाडं कमकुवत होणं ही समस्या साधारणतः वाढत्या वयासोबत दिसून येत होती. परंतु, सध्या तरुण महिलांमध्ये विशेषत: २० ते ४० वयोगटातील महिला हाडांशी संबंधित आजाराने त्रस्त असल्याचं आढळून येत आहे. हाडांचे हे दुखणं महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर वाढत असे. मात्र आता ऑस्टिओपोरोसिस आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्याचे खूप आधीच निदान होत आहे. त्यामुळे महिलांनी हाडांच्या आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ४५ वर्षांखालील जवळपास ४०% महिलांमध्ये हाडे कमकुवत होणे, गुडघेदुखी किंवा चुकीच्या पोस्चरची लक्षणे दिसत आहेत. तर २५–३५ वयोगटातील प्रत्येक ३ पैकी १ महिलेमध्ये हाडांची घनता कमी किंवा व्हिटॅमिन डीची कमतरता आढळते. 

कामकाजी महिलांनी आपल्या हाडांच्या आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. कारण बसून काम करण्याची पद्धत, सूर्यप्रकाशाचा अभाव, ताणतणाव आणि अनियमित आहार या सर्व गोष्टी मोठे जोखमीचे घटक ठरले आहेत. अनेक महिला नियमित तपासण्या टाळतात आणि हाडे कमजोर होईपर्यंत किंवा दीर्घकालीन वेदना सुरू होईपर्यंत लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य काळजी घ्यावी.

पायऱ्या चढताना- उतरताना हाडांमधून सतत कटकट आवाज येतो? कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे

काय आहेत कारणं?

सध्या कामकाजी महिला ताण, वजन वाढ, उच्च रक्तदाब, मधुमेह या समस्या तर भोगत आहेतच. पण आता त्यात हाडांच्या समस्याही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. अनुप गाडेकर म्हणाले की,  “अनेक कामकाजी महिलांना दीर्घकाळ बसून राहणे, चुकीचा पोस्चर, सूर्यप्रकाशाचा अभाव, अनियमित जेवण, जास्त कॅफिन आणि कॅल्शियमच्या कमी सेवनामुळे ऑस्टिओपोरोसिस, व्हिटॅमिन डीची कमतरता आणि सांधेदुखी यांसारख्या समस्या वाढताना दिसतात. विशेषतः ऑफिसमध्ये दीर्घकाळ घरात राहिल्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता वाढते. 

४५ वर्षांखालील जवळपास ४०% महिलांना सतत गुडघेदुखी, पाठदुखी, थकवा आणि पोस्चरमध्ये तक्रारी जाणवतात. याहून अधिक चिंताजनक म्हणजे २५ ते ३५ वयोगटातील प्रत्येक ३ पैकी १ महिलेमध्ये हाडांची घनता कमी किंवा व्हिटॅमिन डीची पातळी घटलेली दिसते. हे तरुण महिलांमधील एक ‘सायलेंट हेल्थ एपिडेमिक’ ठरत आहे. कामकाजी महिलांमध्ये दिसणारी सामान्य लक्षणे म्हणजे पाठदुखी, गुडघेदुखी, कडकपणा आणि सततचा थकवा. याकडे दुर्लक्ष केल्यास वारंवार फ्रॅक्चर होणे, पोस्चर विकृती आणि चालण्यात अडचणी अशा गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे योग्य वेळी तपासणी, संतुलित आहार आणि रोजची शारीरिक हालचाल हाडांच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक आहेत.”

कोणते उपाय करावेत

डॉ. गाडेकर पुढे म्हणाले, “बोन डेन्सिटी टेस्टसारख्या तपासण्या आणि साध्या जीवनशैलीतील बदल  जसे की संतुलित आहार, सकाळच्या चालणे, नियमित व्यायाम यामुळे मोठा फरक पडू शकतो. हाडांचे आरोग्य हे वयाशी संबंधित नसून जागरूकता आणि रोजची काळजी यावर अवलंबून आहे. नियमित व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम तपासणी, योग्य पोस्चर ठेवणे आणि आहारात दूध, दही, हिरव्या भाज्या, सुका मेवा आणि मासे यांचा समावेश करणे आवश्यक आहे. तसेच चालणे, योगा किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंगसारखे वजन वहन करणारे व्यायाम हाडे मजबूत करण्यास खूप मदत करतात. महिलांनी आता आपल्या हाडांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची योग्य वेळ आली आहे सक्रिय रहा आणि जीवनाचा दर्जा सुधारावा.”

206 हाडं होतील अधिक बळकट, वापरा बाबा रामदेव यांचा रामबाण उपाय 2 चमचे गायीच्या तुपासह शेवग्याच्या शेंगांची कमाल

Web Title: Bone pain is increasing among office going women alarmed by the deficiency of vitamin d says doctor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 05:23 PM

Topics:  

  • Health Tips
  • strong bones
  • women health

संबंधित बातम्या

पुरूषांनो सावधान! Erectile Dysfunction ठरू शकते मधुमेहाचे लक्षण, वेळीच ओळखा धोका
1

पुरूषांनो सावधान! Erectile Dysfunction ठरू शकते मधुमेहाचे लक्षण, वेळीच ओळखा धोका

Male Fertility Fitness: Sperms च्‍या उत्तम आरोग्‍यासाठी १२ आठवड्यांचा रिसेट प्‍लॅन, काय सांगतात तज्ज्ञ
2

Male Fertility Fitness: Sperms च्‍या उत्तम आरोग्‍यासाठी १२ आठवड्यांचा रिसेट प्‍लॅन, काय सांगतात तज्ज्ञ

सुपारीच्या पानाचा हा देसी जुगाड छातीतील सर्व श्लेष्मा 7 दिवसांत काढेल बाहेर, खोकलाही होईल दूर; स्वतः डॉक्टरांनी दिला सल्ला
3

सुपारीच्या पानाचा हा देसी जुगाड छातीतील सर्व श्लेष्मा 7 दिवसांत काढेल बाहेर, खोकलाही होईल दूर; स्वतः डॉक्टरांनी दिला सल्ला

हिवाळ्यात हळदीचं दूध का प्यायला हवं? शरीराला मिळतात अनेक आश्चर्यचकित फायदे
4

हिवाळ्यात हळदीचं दूध का प्यायला हवं? शरीराला मिळतात अनेक आश्चर्यचकित फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.