पोटावर वाढलेले चरबीचे टायर्स होतील झपाट्याने कमी! रोजच्या आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी उपाय?
वजन वाढण्याची कारणे?
वजन कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
झपाट्याने वाढणारे वजन अनेकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. जगभरात लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या लोकांनी संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. वजन वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. हातापायांवर वाढलेला चरबीचा थर, मोठे झालेले पोट, चेहऱ्यावरील अनावश्यक चरबी इत्यादी अनेक अनेक गोष्टींमुळे लुक पूर्णपणे खराब दिसू लागतो. वजन वाढण्यास जीवनशैलीतील लहान मोठ्या सवयी कारणीभूत ठरतात. जंक फूडचे अतिसेवन, सतत तिखट तेलकट पदार्थ खाणे, चुकीच्या वेळी जेवणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर होतो. पोट आणि मांड्यांवर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या सप्लिमेंट्सचे सेवन केले जाते तर कधी महागडा डाएट घेऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. पण वारंवार केमिकल युक्त सप्लिमेंट्सचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. शरीराच्या कोणत्याही अवयवांवर साचून राहिलेल्या चरबीमुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो.(फोटो सौजन्य – istock)
लवकर वजन कमी करण्यासाठी अनेक लोक पूर्णपणे खाणे थांबवतात तर काही क्रॅश डाएटिंग करण्यास सुरुवात करतात. यामुळे काहीकाळ वजन कमी झाल्यासारखे वाटू लागते. पण कालांतराने वजन पुन्हा झपाट्याने वाढते. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात नैसर्गिक पदार्थांचा समावेश करावा. चुकीचा डाएट किंवा फास्टिंग केल्यामुळे आरोग्य बिघडून जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन केल्यास नैसर्गिकरित्या वाढलेले वजन कमी होण्यासोबतच पोटावर वाढलेला चरबीचा घेर सुद्धा कमी होऊन जाईल.
दुपारच्या जेवणात नियमित एक ग्लासभर ताक प्यावे. जिऱ्याची पावडर मिक्स करून ताकाचे सेवन केल्यास खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात. याशिवाय वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. जिरं, काळीमिरी आणि काळे मीठ यांची एकत्र पावडर तयार करून नियमित एक ग्लास ताकात मिक्स करून प्यावी. यामुळे पचनक्रिया कायमच चांगली राहते. शरीरावर वाढलेली चरबी जाळण्यासाठी ताक अतिशय फायदेशीर ठरते.
सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात मध मिक्स करून प्यायल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यास मदत होईल. मधामध्ये असणारे घटक फॅट जाळून टाकण्यासाठी मदत करतात. मधाचे सेवन केल्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा कमी होऊन जाते. तसेच मधाच्या पाण्यात तुम्ही लिंबाचा रस सुद्धा मिक्स करून पिऊ शकता. यामुळे चयापचय क्रियेचा वेग सुधारेल.
सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात त्रिफळा पावडर मिक्स करून प्यायल्यास आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्यासोबतच पोटावर वाढलेला चरबीचा थर सुद्धा कमी होईल. त्रिफळा पावडर किंवा आल्याच्या पावडरचे सेवन केल्यास आतड्यांची हालचाल सुलभ होते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
Ans: पोटाच्या आसपासच्या भागात जमा होणारी चरबी
Ans: पोटावरील व्हिसरल फॅटमुळे हृदयविकार, टाईप २ मधुमेह, उच्च रक्तदाब सारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
Ans: भरपूर फळे, भाज्या, पातळ प्रथिने आणि संपूर्ण धान्ये खाण्यावर भर द्या.






