
वातावरणातील बदलांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाली आहे? मग नियमित प्या 'हे' आयुर्वेदिक काढे, आजारांपासून होईल बचाव
राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शरीरसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. वातावरणात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, कमी पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे वर्षाच्या बाराही महिने शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. पावसाळ्यात संसर्ग आणि हंगामी आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, डेंग्यू, मलेरिया इत्यादी आजारांचा धोका वाढून आरोग्य बिघडते. सर्दी खोकला झाल्यानंतर मेडिकलमधील गोळी किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार केले जातात. पण कायमच गोळ्या औषध खाण्याऐवजी घरगुती उपाय करून पाहावेत. यामुळे साथीच्या आजारांपासून सुटका मिळते आणि आरोग्य सुधारते.(फोटो सौजन्य – istock)
दमट वातावरणामुळे सर्दी खोकला होऊन घशात वेदना, घसा खवखवणे किंवा खोकला येतो. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरी तयार केलेला काढा प्यावा. काढा प्यायल्यामुळे साथीच्या आजारांपासून सुटका मिळते आणि आरोग्य सुधारते. आयुर्वेदिक पदार्थांपासून बनवलेला काढा प्यायल्यामुळे पचनक्रिया सुद्धा मजबूत आणि निरोगी राहते. आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी काढा पिणे उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया आयुर्वेदिक काढा पिण्याचे फायदे आणि काढा बनवण्याची सोपी कृती.
आयुर्वेदिक काढा बनवण्यासाठी टोपात एक ते दीड ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात तुळस, आलं आणि काळीमिरी घालून पाण्याला व्यवस्थित उकळी काढा. टोपातील पाणी अर्धा झाल्यानंतर गॅस बंद करून काढा गाळून घ्या. तयार केलेल्या काढ्यात थोडस गूळ घालून मिक्स करा आणि कोमट असताना सेवन करा. यामुळे या काढ्याच्या सेवनामुळे साथीचे आजार, सर्दी खोकला आणि इतर संसर्गापासून सुटका मिळेल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
घरात माशा-डासांचा त्रास वाढलाय? फरशी पुसताना पाण्यात मिसळा ‘या’ गोष्टी मिसळा, मिळेल आराम
दालचिनीचा वापर जेवणातील विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. यामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. दालचिनीचा काढा प्यायल्यास साथीच्या आजारांपासून सुटका मिळते, यासोबतच रोगप्रतिकारशक्ती सुद्धा सुधारते. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा दालचिनीचा काढा बनवून प्यावा. टोपात एक ग्लासभर पाणी गरम करून त्यात दालचिनी, लवंग आणि काळीमिरी घालून पाण्याला उकळी काढा. पाण्याला उकळी आल्यानंतर पाणी गाळून त्यात गूळ घालून सेवन करा. पण गर्भवती, स्तनपान करणाऱ्या महिला आणि गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने काढ्याचे सेवन करावे.
Ans: ऋतू बदलताना तापमान, आर्द्रता आणि वातावरणातील बदलांमुळे शरीरावर ताण येतो, त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती काही प्रमाणात कमी होऊ शकते.
Ans: सामान्यतः दिवसातून 1 ते 2 वेळा मर्यादित प्रमाणात सेवन केले जाते. अति सेवन टाळावे.
Ans: सर्वांसाठी ते योग्य असेलच असे नाही. संवेदनशील पोट किंवा ॲसिडिटीचा त्रास असल्यास हलक्या आहारानंतर घेणे अधिक योग्य ठरू शकते.