लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा 'चॉकलेट चिकू मिल्कशेक'
सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी नेहमीच काय बनवावं? हे पालकांना सुचत नाही. मुलांना नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर खाण्यासाठी बाहेरचे तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाण्याची जास्त इच्छा होते. मात्र नेहमीच मुलांना बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यास देऊ नये. यामुळे मुलांच्या शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.लहान मुलांना नाश्त्यात फळे, स्मूदी किंवा मिल्कशेक पिण्यास द्यावे. यामुळे मुलांना पोषण मिळेल आणि त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. म्हणूनच आज माही तुम्हाला लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात चॉकलेट चिकू मिल्कशेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चिकू खाल्यानंतर आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले पोषक घटक आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे ठरतात. चला तर जाणून घेऊया चॉकलेट चिकू मिल्कशेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
आंबटगोड कच्च्या कैरीपासून बनवा चवदार कैरीच्या वड्या, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने