Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breastfeeding: पूर्वीच्या तुलनेत आता स्तनपान अधिक आव्हानात्मक का वाटतेय? ‘या’ कारणांमुळे वाढू शकतात अडचणी

Breastfeeding: जीवनशैलीत होणारे बदल, वाढता ताणतणाव, अपुरी झोप, प्रसूतीनंतर लवकर कामावर रुजू झाल्यामुळे स्तनपानाचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक आव्हानात्मक होऊन जातो. ज्याचा परिणाम आई आणि नवजात बाळावर होण्याची शक्यता असते.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 03, 2026 | 12:35 PM
Breastfeeding: पूर्वीच्या तुलनेत आता स्तनपान अधिक आव्हानात्मक का वाटतेय? ‘या’ कारणांमुळे वाढू शकतात अडचणी

Breastfeeding: पूर्वीच्या तुलनेत आता स्तनपान अधिक आव्हानात्मक का वाटतेय? ‘या’ कारणांमुळे वाढू शकतात अडचणी

Follow Us
Follow Us:

मुंबई: जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि युनिसेफच्या शिफारसीनुसार, बाळाला जन्मानंतर पहिल्या सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूध देणे महत्त्वाचे आहे. मात्र, बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव, अपुरी झोप, प्रसूतीनंतर लवकर कामावर रुजू होण्याची गरज, विभक्त कुटुंबपद्धती, सोशल मीडियावरील चुकीची माहिती आणि कुटुंबीयांकडून पुरेसा आधार न मिळणे यामुळे अनेक नवमातांसाठी स्तनपानाचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक आव्हानात्मक ठरत आहे. याविषयी डॉ. अमित पी. घावडे, बालरोग आणि नवजात शिशु तज्ज्ञ, मदरहुड हॉस्पिटल, खारघर, नवी मुंबई यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)

Cancer: कर्करोगाचा धोका वेळीच ओळखायचा? नियमित आरोग्य तपासणीतील ‘या’ चाचण्या ठरू शकतात अतिशय महत्त्वाच्या

स्तनपान ही केवळ बाळाला पोषण देण्याची प्रक्रिया नसून आई आणि बाळाच्या आरोग्याशी जोडलेला महत्त्वाचा टप्पा आहे. अनेक मातांना दूध कमी येत असल्याचा गैरसमज होतो, तर काही वेळा बाळाला योग्य पद्धतीने स्तनपान करवता येत नाही. स्तनांमध्ये वेदना, स्तनाग्रांना होणारी जखम किंवा दुखणे, योग्य स्तनपान तंत्राची माहिती नसणे आणि मानसिक ताण यामुळेही अडचणी निर्माण होऊ शकतात. योग्य वेळी मार्गदर्शन न मिळाल्यास काही माता काही आठवड्यांतच स्तनपान थांबवण्याचा निर्णय घेतात.

आजच्या काळात सोशल मीडियामुळे नवमातांकडे माहितीच्या अनेक स्रोत उपलब्ध आहेत. मात्र, सोशल मीडियावर मिळणारी प्रत्येक माहिती योग्य किंवा वैज्ञानिक असेलच असे नाही. इतर मातांशी तुलना, अवास्तव अपेक्षा आणि चुकीचे सल्ले यामुळे अनेक मातांचा आत्मविश्वास कमी होतो. प्रत्यक्षात स्तनपानातील अनेक अडचणी योग्य मार्गदर्शन आणि सुरुवातीच्या काळात मिळणाऱ्या मदतीमुळे सहज दूर करता येतात. त्यामुळे आईने समस्या मनात न ठेवता डॉक्टर किंवा स्तनपान तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.”

स्तनपानातील प्रमुख आव्हाने

  • प्रसूतीनंतर अपुरी झोप आणि शारीरिक थकवा
  • वाढता मानसिक ताण आणि प्रसूतीनंतरची चिंता
  • प्रसूतीनंतर लवकर नोकरीवर रुजू होण्याची गरज
  • कुटुंबीय किंवा जोडीदाराकडून पुरेसा भावनिक व व्यावहारिक आधार न मिळणे
  • विभक्त कुटुंबपद्धतीमुळे अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन न मिळणे
  • सोशल मीडियावरील चुकीची माहिती आणि गैरसमज
  •  कामाच्या ठिकाणी स्तनपानासाठी योग्य सुविधा किंवा पुरेसा वेळ उपलब्ध नसणे
  • दूध कमी येत असल्याचा गैरसमज होऊन बाळाचे पोट भरत नसल्याचे वाटणे आणि लवकर फॉर्म्युला दूध सुरू करणे
स्तनपान यशस्वी होण्यासाठी केवळ आईची इच्छाशक्ती पुरेशी नसून तिच्या आजूबाजूचे वातावरणही तितकेच महत्त्वाचे असते. आईला पुरेशी विश्रांती, पौष्टिक आहार, मानसिक आधार आणि योग्य स्तनपान तंत्राची माहिती मिळाल्यास सुरुवातीच्या अनेक अडचणी टाळता येऊ शकतात.

आंबट ढेकर आणि पित्ताच्या त्रासाने हैराण झाला आहात? Acidity च्या वाढत्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

डॉक्टरांच्या मते, नवमातांनी स्तनपान करताना वेदना, बाळाला दूध पिण्यात अडचण, बाळाचे वजन अपेक्षेप्रमाणे न वाढणे किंवा दूध कमी येत असल्याची चिंता जाणवल्यास स्वतःहून निर्णय घेण्याऐवजी त्वरित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. योग्य वेळी मिळणारे मार्गदर्शन, कुटुंबाचा आधार आणि आईचा आत्मविश्वास हे यशस्वी स्तनपानासाठी महत्त्वाचे घटक आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आजच्या काळात स्तनपान अधिक आव्हानात्मक का वाटते?

    Ans: बदलती जीवनशैली, झोपेचा अभाव, कामाचा ताण, प्रसूतीनंतरचा शारीरिक-मानसिक ताण आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे काही मातांना स्तनपान अधिक आव्हानात्मक वाटू शकते.

  • Que: स्तनपान करताना कोणत्या सामान्य अडचणी येऊ शकतात?

    Ans: बाळाला योग्य पद्धतीने स्तनाला न लागणे, स्तनाग्रांमध्ये वेदना, दूध कमी असल्याची चिंता, स्तनांमध्ये ताण किंवा दूध साचणे आणि बाळाच्या फीडिंग पॅटर्नशी जुळवून घेण्यास होणारी अडचण अशा समस्या येऊ शकतात.

  • Que: ताणामुळे स्तनपानावर परिणाम होतो का?

    Ans: ताण आणि थकवा आईच्या स्तनपानाच्या अनुभवावर परिणाम करू शकतात. त्यामुळे पुरेशी विश्रांती, आधार आणि योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते.

Web Title: Breastfeeding why does breastfeeding feel more challenging now compared to the past these factors could increase the difficulties

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 12:35 PM

Topics:  

  • breastfeeding
  • LIFESTYLE
  • newborn baby

संबंधित बातम्या

शेती औषध फवारण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची काळजी नक्की घ्या; नाहीतर बेतेल जीवावर!
1

शेती औषध फवारण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची काळजी नक्की घ्या; नाहीतर बेतेल जीवावर!

इंग्रजीत Apple, मग मराठीत ‘सफरचंद’ का? काय आहे या कश्मीरी फळाची महाराष्ट्रीयन गोष्ट! जाणून घ्या
2

इंग्रजीत Apple, मग मराठीत ‘सफरचंद’ का? काय आहे या कश्मीरी फळाची महाराष्ट्रीयन गोष्ट! जाणून घ्या

इंग्रजीत Guava, मग मराठीत ‘पेरू’ का? आपण खातो त्या ‘पेरू’ फळाचा थेट संबंध आहे एका देशाशी! वाचा याचा रंजक इतिहास!
3

इंग्रजीत Guava, मग मराठीत ‘पेरू’ का? आपण खातो त्या ‘पेरू’ फळाचा थेट संबंध आहे एका देशाशी! वाचा याचा रंजक इतिहास!

Janmashtami Rangoli Designs: जन्माष्टमीला अंगणासमोर काढा ‘या’ आकर्षक डिझाईनच्या रांगोळ्या; पाहता क्षणी डिझाईनने जिंकेल मन
4

Janmashtami Rangoli Designs: जन्माष्टमीला अंगणासमोर काढा ‘या’ आकर्षक डिझाईनच्या रांगोळ्या; पाहता क्षणी डिझाईनने जिंकेल मन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.