
महाराष्ट्रच प्रामुख्याने खेळला जाणारा पारंपारिक खेळ हस्त नक्षत्राच्या १५-१६ दिवसांत खेळला जातो. सहसा या खेळात स्त्रिया मोठ्या संखेने भाग घेत असतात. पश्चिम महाराष्ट्र आणि कोंकणात बऱ्यापैकी प्रचलित असणारा हा हादगा ज्याला भोंडला असही म्हणल जात. हत्तीच चित्र काढून जो सम्मृद्धीचं प्रतिक आहे, त्याची पूजा केली जाते. आणि त्या चित्राभोवती फेर धरून गाणी म्हणाली जातात. बऱ्याच ठिकाणी पाटावर तांदळाचा हत्ती काढूनही त्याची पूजा केली जाते. सासू सासरे, नणंद भावजयी, नवरा दीर अशा नात्यागोत्यांवरीलही गाणी असतात, सहसा मुली-स्त्रिया हा खेळ खेळत असल्याने माहेरवरचीही गाणी अगदी उत्साहात गायली जातात. लोकगीतांचाही यात समावेश असतो.
उधार घेतलेले पैसे परत करायला लोक टाळाटाळ का करतात? जाणून घ्या यामागचं मानसशास्त्र
हादग्याची गाणी हा या उत्सवाचा सर्वात आकर्षक भाग आहे. ‘श्रीकांता कमलाकांता, अस्सं कस्सं झालं!’ यांसारख्या गाण्यांमधून विनोद, कौटुंबिक नाती आणि दैनंदिन जीवनातील प्रसंग रंगवले जातात. सासू-सासरे, नणंद-भावजय, नवरा आणि इतर नात्यांवर आधारित गाण्यांबरोबरच माहेरच्या आठवणी आणि लोकजीवनाचे चित्रणही या गीतांमध्ये दिसते. पिढ्यान्पिढ्या मौखिक परंपरेने ही गाणी पुढे आली आहेत.
अश्विन भाद्रपद महिन्याच्या दरम्यान नवरात्री– दसरा सणाच्या वेळीही हा खेळ खेळला जातो. यात ज्या घरच्या अंगणात हादगा खेळायचा असतो, त्या घरची स्त्री खिरापत बनवते,म्हणजे काही खायला बनवते. आणि to पदार्थ डब्यात ठेवला जातो, इतर मुलीही त्यांचे त्यांचे पदार्थ डब्यात घेऊन जातात. एकमेकिनी हे ओळखायचे असते कि कोणता पदार्थ आणला आहे. ही या खेळाची आणखीन एक मजा म्हणता येईल.
आजकालच्या तणावपूर्व आणि धकाधकीच्या जीवनात एक विरुंगळा म्हणून, आपली परंपरा जपण्यासाठीही हा खेळ खेळला गेला पाहिजे. आपली संस्कृती म्हणून आपल्या रूढी परंपरा जपणे, जोपासणे महत्त्वाचे आहे, नाही का?
म्हसोबाचं देऊळ शेतातल्या बांधावरच का असतं? नेमका कोण आहे हा गावाकडचा म्हसोबा देव? जाणून घ्या
प्रश्न 1: हादगा म्हणजे काय?
उत्तर: हादगा हा महाराष्ट्रातील पारंपरिक सांस्कृतिक खेळ आणि उत्सव आहे. याला भोंडला असेही म्हटले जाते. यात हत्तीच्या चित्राची पूजा करून महिला आणि मुली गोलाकार फेर धरतात व पारंपरिक गाणी गातात.
प्रश्न 2: हादगा कोणत्या काळात खेळला जातो?
उत्तर: हादगा साधारणपणे हस्त नक्षत्राच्या काळात आणि नवरात्र-दसऱ्याच्या आसपास खेळला जातो. काही भागांत हा उत्सव सलग 15 ते 16 दिवस साजरा केला जातो. कालावधी आणि पद्धती प्रदेशानुसार बदलू शकतात.
प्रश्न 3: हादग्यात खिरापतीचा खेळ कसा खेळतात?
उत्तर: सहभागी मुली आणि महिला वेगवेगळे खाद्यपदार्थ डब्यात आणतात. त्यानंतर प्रत्येक डब्यात कोणता पदार्थ आहे, हे ओळखण्याचा खेळ खेळला जातो. यामुळे उत्सवात आनंद, मैत्री आणि सामूहिक सहभाग वाढतो.