Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयाच्या साठीत येईल चेहऱ्यावर चमकदार ग्लो! सकाळी नियमित खा ‘ही’ फळे, त्वचा राहील कायम तरुण आणि तेजस्वी

वाढत्या वयात चेहऱ्यावर सुरकुत्या वाढू लागतात. यामुळे त्वचा अधिक वयस्कर दिसू लागते. या सुरकुत्या कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित फळांचे सेवन करावे. फळे खाल्यामुळे आरोग्य सुधारते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 18, 2025 | 05:30 AM
वयाच्या साठीत येईल चेहऱ्यावर चमकदार ग्लो! सकाळी नियमित खा 'ही' फळे

वयाच्या साठीत येईल चेहऱ्यावर चमकदार ग्लो! सकाळी नियमित खा 'ही' फळे

Follow Us
Close
Follow Us:

वय वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. त्वचेवर आलेल्या सुरकुत्या, काळे डाग, पिंपल्स किंवा शरीरसंबधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या सौंदर्य प्रसाधनांचा करतात. याशिवाय वेगवेगळे स्किन केअर प्रॉडक्ट, मेकअप इत्यादी अनेक गोष्टी वापरल्या जातात. त्वचेवर वाढलेल्या सुरकुत्या किंवा इतर समस्या कमी करण्यासाठी मेकअप केले जाते. मात्र मेकअप केल्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होत नाही तर काहीवेळा आणखीनच वाढू लागतात. त्यामुळे दीर्घकाळ त्वचा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या ताज्या फळांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला चमकदार त्वचेसाठी आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – pinterest)

पिगमेंटेशनमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ त्वचा करतील उजळदार, त्वचेच्या सर्व समस्या होतील गायब

किवी:

किमतीने महाग असलेले किवी हे फळ खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामुळे त्वचेच्या सौंदर्यत वाढ होते. किवीमध्ये मोठ्या प्रमाणावर विटामिन सी आढळून येते. ज्यामुळे त्वचेतील कोलेजन निर्मिती वाढते. त्वचेमधील कोलेजन त्वचा घट्ट ठेवण्यास आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे आहारात किवी खाल्यामुळे त्वचेवरील काळेपणा आणि टॅनिंग कमी होण्यास मदत होते. फ्रुट सॅलड बनवताना त्यात तुम्ही किवी टाकू शकता.

काळी द्राक्ष:

बाजारात काळी द्राक्ष हिवाळ्याच्या दिवसांमध्ये उपलब्ध असतात. काळ्या द्राक्षांचे सेवन करणे अनेकांना आवडत नाही. कारण या द्राक्षांची साल चवीला तुरट लागते. पण आरोग्यासाठी हीच द्राक्ष गुणकारी आहेत. ​काळ्या द्राक्षांमध्ये आढळून येणारे रेसव्हेराट्रॉल हे अँटी-एजिंग कंपाउंड त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव करण्यासाठी मदत करतात. तसेच त्वचेवर आलेले इन्फेक्शन, रॅश किंवा लालसरपणा कमी करण्यासाठी काळी द्राक्ष खावीत. रेसव्हेराट्रॉलमुळे त्वचेमधील पेशींचे रक्षण होते.

पपई:

विटामिन सी युक्त पपई खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आणि आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी पपई खावी. यामधील एंजाइम त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यासाठी मदत करतात. त्वचेवर वाढलेले पिगमेंटेशन कमी करण्यासाठी पपई खावी. यासोबतच उपाशी पोटी पपईचे सेवन केल्यामुळे त्वचा अधिक उठावदार आणि सुंदर होते.

महिलांच्या त्वचेसाठी वरदान ठरेल कोरफड गर! ‘या’ पद्धतीने करा नियमित वापर, त्वचेवर दिसून येईल चमकदार ग्लो

स्ट्रॉबेरी:

थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. चवीला आंबटगोड स्ट्रॉबेरी आरोग्य आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरी खाल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. त्वचेवर वाढलेल्या सुरकुत्या आणि इतर समस्या दूर करण्यासाठी स्ट्रॉबेरी खावी. चेहऱ्यावर वाढलेल्या बारीक रेषा कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरी गुणकारी आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Bright glow on the face for age eat these fruits regularly in the morning home remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • glowing face
  • healthy fruits
  • skin care tips

संबंधित बातम्या

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग होईल कायमचे गायब! किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा होईल देखणी
1

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग होईल कायमचे गायब! किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा होईल देखणी

१० रुपयांची कॉफी पावडर त्वचेसाठी ठरेल वरदान, ‘या’ पद्धतीने वापर केल्यास नष्ट होईल चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन
2

१० रुपयांची कॉफी पावडर त्वचेसाठी ठरेल वरदान, ‘या’ पद्धतीने वापर केल्यास नष्ट होईल चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन

७ दिवसात कमी होतील चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि काळे डाग! कडुलिंबाच्या पानांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल स्वच्छ
3

७ दिवसात कमी होतील चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि काळे डाग! कडुलिंबाच्या पानांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल स्वच्छ

चेहऱ्यावर आलेले काळे डाग- वांग होतील कायमचे गायब! ‘या’ पद्धतीने करा जायफळाचा वापर, आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय
4

चेहऱ्यावर आलेले काळे डाग- वांग होतील कायमचे गायब! ‘या’ पद्धतीने करा जायफळाचा वापर, आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.