महिलांच्या त्वचेसाठी वरदान ठरेल कोरफड गर! 'या' पद्धतीने करा नियमित वापर
पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत महिलांसह पुरुष सुद्धा त्वचेसाठी कोरफड जेल वापरतात. कोरफड जेलच्या वापरामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होते. त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफड जेल वापरावे. कोरफड जेल त्वचेसोबत केसांसाठी सुद्धा वापरले जाते. यामध्ये आढळून येणारे अॅंटी-ऑक्सीडेंट्स त्वचेचे फ्री रिडिकोल्सपासून रक्षण करतात. उन्हामुळे वाढलेले टॅनिंग किंवा चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि मुरूम घालवण्यासाठी कोरफड जेलचा वापर तुम्ही करू शकता. त्वचा स्वच्छ करण्यासाठी कोरफड जेल वापरावे. यामुळे चेहऱ्यावर आलेले डाग, पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि पिगमेंटेशन कमी होऊन त्वचा सुधारते. अनेक लोक कोरफड जेलचा वापर करून त्वचा स्वच्छ करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोरफड जेलचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – pinterest)
त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी तुम्ही कोरफड जेल आणि विटामिन ई चा वापर करू शकता. यासाठी वाटीमध्ये ताजे कोरफड जेल घेऊन त्यात विटामिन ई कँप्सूल मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने त्वचा मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी होईल आणि त्वचा स्वच्छ होईल. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करा. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास त्वचा अतिशय स्वच्छ आणि उजळदार दिसेल. हे मिश्रण नियमित त्वचेवर लावल्यास चेहऱ्यावरील रक्त भिसरण सुधारण्यास मदत होईल. त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल.
चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कोरफड आणि ग्लिसरीनचा वापर करू शकता. यासाठी वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यामध्ये ग्लिसरीन टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून संपूर्ण त्वचेवर लावून घ्या. यामुळे त्वचा अतिशय मुलायम होईल. ग्लिसरीन त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करते. ग्लिसरीनचे मिश्रण त्वचेवर लावून हल्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवर नॅचरल ग्लो दिसून येईल. काहीवेळ ठेवल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
सतत लिपस्टिक लावून काळवंडलेले ओठ काही क्षणात होतील गुलाबी! ‘या’ पद्धतीने घरी तयार घरगुती लीप मास्क
चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी बेसनाचा फेसपॅक लावला जातो. बेसन त्वचा स्वच्छ करते. वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात चमचाभर बेसन मिक्स करा. त्यानंतर केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून काहीवेळ हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ धुवा. हा उपाय नियमित केल्यास काही दिवसांमध्ये त्वचेवर नैसर्गिक ग्लो येईल.