
Broccoli Soup Recipe: थंडीच्या दिवसांमध्ये लहान मुलांसाठी बनवा गरमागरम टेस्टी ब्रोकोली सूप, नोट करा रेसिपी
Broccoli Soup Recipe: वातावरणात सतत काहींना काही बदल होत आहेत. या बदलांचा परिणाम थेट शरीरावर होतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते आणि लहान मुलं अशक्त होतात. शरीरात वाढलेला अशक्तपणा कमी करण्यासाठी मुलांना वेगवेगळे पदार्थ खाण्यास दिले जातात. पण भाज्या किंवा कढधान्य खाण्याचा मुलं कायमच कंटाळा करतात. अशावेळी मुलांना तुम्ही झटपट तयार होणारे ब्रोकोली सूप बनवून देऊ शकता. ब्रोकोली शरीरासाठी खूप जास्त फायदे आहे. ब्रोकोलीमध्ये विटामिन -सी, सल्फोराफेन, फायबर इत्यादी अनेक घटक असतात. त्यामुळे आहारात आठवड्यातून दोनदा ब्रोकोलीचा समावेश करावा. टाईप-२ मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी ब्रोकोली खूप जास्त गुणकारी ठरते. चला तर जाणून घेऊया ब्रोकोली सूप बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)