
'या' सोप्या पद्धतीने बनवा बिनपाकातील परांपारिक रव्याचे लाडू, नोट करा रेसिपी
Rava Ladoo: दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दिवाळीच्या आधी घरात साफसफाई करून वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवले जातात. चकली,करंजीपासून ते बेसन, रव्याच्या लाडूपर्यंत अनेक विविध पदार्थ बनवले जातात. त्यातील अतिशय कठीण वाटणारा पदार्थ म्हणजे रव्याचे लाडू. पण रव्याचे लाडू बनवताना कायमच चुका होतात आणि लाडूची चव पूर्णपणे बिघडून जाते. लाडू कधी खूप जास्त कडक होतात तर कधी मऊ होऊन लाडू व्यवस्थित वळता येत नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बिनपाकाचे रव्याचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले रव्याचे लाडू अजिबात कडक होणार नाहीत आणि चव सुद्धा मस्त लागेल. याशिवाय लाडू खालल्यानंतर घरातील सगळेच तुमच कौतुक करतील. चला तर जाणून घेऊया कमी वेळेत आणि झटपट तयार होणारे रव्याचे लाडू.(फोटो सौजन्य – pinterest)