
भाजी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा कुरकुरीत खमंग बटाट्याचे काप
Food Recipe: कामाच्या धावपळीमध्ये कधी कधी जेवण बनवण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी विकतची चपाती, भाजी किंवा जेवणातील इतर पदार्थ आणून खाल्ले जातात. पण नेहमीच विकतचे तेलकट किंवा तिखट पदार्थ आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले टेस्टी आणि शरीरासाठी फायदेशीर ठरणारे पदार्थ खावेत. वरण- भात, खिचडी बनवल्यानंतर त्यासोबत आवडीने बटाट्याची काप खाल्ली जातात. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं बटाट्याची काप खायला खूप जास्त आवडतात. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारे सर्वच पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. लहान मुलं भाजी खाण्याचा खूप जास्त कंटाळा करतात. अशावेळी मुलांना या पद्धतीने बटाट्याची काप बनवून खाण्यास द्यावीत. चपाती किंवा भाकरीसोबत सुद्धा बटाट्याची काप अतिशय टेस्टी लागतात. चला तर जाणून घेऊया बटाट्याची काप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)