Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये गरम पाणी पिणे योग्य आहे का? वेदनांपासून आराम मिळण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पोटात वाढलेल्या वेदना आणि कंबर दुखीपासून सुटका मिळवण्यासाठी गरम पाण्याचे सेवन करण्यासोबतच गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्यावा. चला तर जाणून घेऊया गरम पाणी पिण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 26, 2026 | 08:08 AM
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये गरम पाणी पिणे योग्य आहे का? वेदनांपासून आराम मिळण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये गरम पाणी पिणे योग्य आहे का? वेदनांपासून आराम मिळण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे

Follow Us
Follow Us:

गरम पाणी पिण्याचे फायदे?
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये वेदना का होतात?
पाळीच्या दिवसांमध्ये गरम पाण्याचे सेवन का करावे?

महिलांच्या शरीरातील नैसर्गिक चक्र म्हणजे प्रत्येक महिन्याला मासिक पाळी येणे. पाळीच्या पाच दिवसांमध्ये महिलांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. याशिवाय पोटात पेटके येणे, पोटात वेदना, कंबर दुखणे, उलट्या, मळमळ इत्यादी असंख्य समस्या उद्भवू लागतात. क्रॅम्स, कंबरदुखी आणि अस्वस्थतेमुळे रोजच्या कामात सुद्धा अडथळे निर्माण होते. पोटात वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी महिला बऱ्याचदा मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन करतात. पण वारंवार पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे मेडिकलमधील गोळ्यांचे सेवन न करता आजीबाईच्या बटव्यातील उपचार करावे.(फोटो सौजन्य – istock)

Pelvic Floor Exercises: प्रसूतीपूर्वीच लक्ष द्या! पेल्विक फ्लोर व्यायामाचे प्रसूतीनंतरही मिळतात ‘हे’ फायदे

पोटदुखी किंवा कंबर दुखीपासून आराम मिळवण्यासाठी गरम पाण्याचे सेवन करावे. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत शरीरसंबंधित वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातील औषध उपचार केले जात आहेत. मासिक पाळीच्या वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी गरम पाणी प्यावे. याशिवाय पोटात सतत क्रॅम्स येत असल्यास गरम पाण्याच्या पिशवीने शेक द्यावा. यामुळे वेदना कमी होतात. गरम पाणी किंवा हॉट वॉटर बॅगने शेक दिल्यास कंबर दुखी आणि पोटात वाढलेल्या वेदनांपासून सुटका मिळेल. चला तर जाणून घेऊया गरम पाण्याचे सेवन केल्यास शरीराला होणारे फायदे.

पाळीच्या दिवसांमध्ये गरम पाण्याचे सेवन का करावे?

रक्तभिसरण सुधारते:

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये गरम पाणी प्यायल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारते. यामुळे पेल्विक एरियामधील रक्तभिसरण सुधारते आणि स्नायूंवर वाढलेला तणाव कमी होतो. याशिवाय आसपासच्या स्नायूंमध्ये रक्तप्रवाह चांगला राहतो आणि वेदना कमी होतात. पण मासिक पाळी आल्यानंतर खूप जास्त वेदना होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे फार आवश्यक आहे.

पचनक्रिया सुधारते:

मासिक पाळी आल्यानंतर बऱ्याच महिलांना गॅस, पोट फुगणे आणि अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या वाढू लागतात. बद्धकोष्ठता वाढल्यामुळे पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही आणि आतड्यांमध्ये घाण तशीच साचून राहते. यामुळे सुद्धा पोट दुखीचा त्रास होतो. या सर्व त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी गरम पाणी प्यावे. गरम पाणी प्यायल्यामुळे पोटात वाढलेला गॅस बाहेर पडून जातो आणि पोट स्वच्छ होते.

Organ Donation After Death at Home: घरी मृत्यू झाल्यानंतरही अवयवदान शक्य? कोणते अवयव दान करता येतात, जाणून घ्या

शरीर हायड्रेट राहते:

मासिक पाळी आल्यानंतर सुरुवातीच्या दोन दिवसांमध्ये शरीरात खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. अशावेळी शरीराला आवश्यक पोषण देणे सुद्धा फार गरजेचे आहे. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी कोमट पाणी प्यावे. कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीराला ऊर्जा मिळते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मासिक पाळीच्या दिवसांत गरम पाणी पिणे योग्य आहे का?

    Ans: कोमट किंवा गरम पाणी पिणे सामान्यतः सुरक्षित आहे. यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते आणि काही महिलांना पोटातील कळा व अस्वस्थता कमी जाणवू शकते.

  • Que: गरम पाणी प्यायल्याने मासिक पाळीच्या वेदना कमी होतात का?

    Ans: कोमट पाणी प्यायल्याने काही महिलांना आराम मिळू शकतो. मात्र वेदना कमी करण्यासाठी गरम पाण्याची पिशवी पोटावर ठेवणे, पुरेशी विश्रांती घेणे आणि हलका व्यायाम करणे यांसारख्या उपायांचाही उपयोग होऊ शकतो.

  • Que: पाळीच्या काळात गरम पाणी प्यायल्याने पचनक्रियेला फायदा होतो का?

    Ans: पुरेसे द्रवपदार्थ घेतल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि बद्धकोष्ठतेसारख्या तक्रारी कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र गरम पाणी हे पचनाच्या सर्व समस्यांवरील उपचार नाही.

Web Title: Can warm water relieve period pain know the benefits of drinking it during menstruation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 08:08 AM

Topics:  

  • Menstrual health
  • Periods
  • women health

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.