महिलांच्या 'या' चुका ठरू शकतात गर्भपाताचे कारण
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, बिघडलेली मानसिक आरोग्य, पोषक तत्वांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींमुळे महिलांचे आरोग्य बिघडते. कामाच्या धावपळीमध्ये महिला स्वतःच्या आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. प्रत्येक महिलेच्या आयुष्यात आई होणं ही भावना अतिशय आनंदायी आणि संवेदनशील आहे. मात्र या दिवसांमध्ये आरोग्याकडे थोडे जरी दुर्लक्ष केले तर शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. महिलांचा निष्काळजीपणा त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतो. तर काहीवेळा गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाची योग्य वाढ होत नाही. चुकीची जीवनशैली आणि निष्काळजीपणामुळे गर्भपात होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे महिलांनी गर्भधारणेच्या दिवसांमध्ये स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – iStock)
मधुमेह, कॅन्सरग्रस्तांना सरकारचा धक्का! सरकारी नियंत्रणातील औषधांची होणार दरवाढ? नेमकं कारण काय..
गर्भधारणेच्या दिवसांमध्ये महिला चुकीची जीवनशैली आणि गोळ्या औषध घेणे टाळतात, ज्याचा परिणाम गर्भातील बळावर होतो. गर्भातील बाळावर परिणाम झाल्यानंतर काहीवेळा गर्भपात होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गर्भपात होण्यामागे नेमकी काय कारण आहेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या चुका टाळून आरोग्याची जास्त काळजी घ्यावी.
गर्भधारणेच्या दिवसांमध्ये महिलांनी चुकूनही कॉफी किंवा अल्कोहोल युक्त पदार्थांचे सेवन करू नये. या पदार्थांचे सेवन करणे बाळाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. कॅफीनयुक्त पदार्थांचे जास्त सेवन केल्यास गर्भपाताचा धोका वाढतो. गरोदरपणात दारू किंवा इतर अमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे बाळाच्या शारीरिक विकासावर परिणाम होतो आणि शरीराचे कार्य बिघडते. या पदार्थांच्या सेवनामुळे गर्भधारणे दरम्यान गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते.
महिलांच्या शरीरात वाढलेला मानसिक तणाव आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. मानसिक तणावामुळे शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. तणाव वाढल्यामुळे कॉर्टिसोल या संप्रेरकाची पातळी वाढू लागते, ज्यामुळे बाळाच्या विकासात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. तणावामुळे रक्तदाब आणि साखरेची पातळी वाढते आणि गर्भपाताचा धोका वाढू लागतो.
दैनंदिन आहारात ताजे आणि पचनास हलके असलेले पदार्थ खावेत. सतत बाहेरच्या तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यास पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. कच्चे मांस, कमी शिजवलेल्या भाज्या आणि कच्चे न दूध पिणे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकते. अन्नपदार्थांमधून विषबाधा झाल्यास बाळाच्या जीवाला धोका निर्माण होतो, ज्यामुळे काहीवेळा गर्भपात होण्याची शक्यता वाढते.