प्रोटीनसाठी दररोज चिकन खाताय? तर सावधान! मृत्यू येतोय जवळ, नव्या अभ्यासात धक्कादायक खुलासा
आपल्या शरीराला प्रथिनांची फार गरज असते, जी पूर्ण करण्यासाठी लोक चिकनचे सेवन करू पाहतात. अनेकजण रोजच्या डाएट रुटीनमध्ये चिकनचा समावेश करतात. मांसाहारी लोकांच्या ताटात चिकन हा सर्वात सामान्य पदार्थ आहे. चिकनपासून अनेक पदार्थ बनवले जातात जे चवीला फार अप्रतिम लागतात. चिकन आरोग्याला अनेक फायदे देखील मिळवून देतो मात्र याचे अतिसेवन आपल्या आरोग्यासाठी घातक देखील ठरू शकते. अलीकडेच एक नवीन अभ्यास समोर आला आहे ज्याने सर्वांना हादरून सोडले आहे. या अभ्यासामुळे चिकन प्रेमींमध्ये चिंता निर्माण झाली आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की जास्त चिकन खाल्ल्याने मृत्युदर वाढतो. अभ्यासात नक्की कोणत्या बाबी नमूद केल्या आहेत ते चला जाणून घेऊया.
मृत्यूचा धोका वाढतोय
‘न्यूट्रिएंट्स’ मध्ये अलीकडील एका अभ्यासात हाय चिकन कंजम्पशन आणि वाढते मृत्यूदर यांच्यात संभाव्य संबंध असल्याचे स्पष्ट झाले . या संशोधनात असे आढळून आले की, ज्यांनी दर आठवड्याला ३०० ग्रॅमपेक्षा जास्त चिकन खाल्ले त्यांना १०० ग्रॅमपेक्षा कमी चिकन खाल्लेल्यांपेक्षा मृत्यूचा धोका २७% जास्त होता.
३०० ग्रॅमहुन अधिक चिकन खाणे ठरेल घातक
या लोकसंख्या-आधारित संभाव्य समूह अभ्यासात दक्षिण इटलीमध्ये मांस सेवन आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कर्करोग (GC) आणि मृत्युच्या इतर कारणांमधील संबंध तपासले गेले. यात असे आढळून आले की ज्या लोकांनी ३०० ग्रॅमपेक्षा जास्त पोल्ट्री मांस खाल्ले त्यांना १०० ग्रॅमपेक्षा कमी पोल्ट्री मांस खाणाऱ्यांच्या तुलनेत सर्व कारणांमुळे आणि जीसीमुळे मृत्यूचा धोका २७% जास्त होता. त्यातही महिलांपेक्षा पुरुषांना हा धोका जास्त असतो. अभ्यासानुसार, चिकनचे जास्त सेवन केल्याने मृत्यूचा धोका वाढू शकतो. अशात तुम्ही दररोज आणि आठ्वड्याभरात किती चिकन खाता यावर विशेष लक्ष ठेवावे लागेल.
तुमचा DNA तर तुमच्या स्ट्रेसचे कारण नाही? हे आहेत Genetic Stress चे 3 संकेत; वेळीच व्हा सावध
प्रोटीनच्या अन्य सोर्सचे सेवन सुरु करा
चिकन ऐवजी तुम्ही तुमच्या आहारात इतर प्रोटीन स्रोतांचाही समावेश करू शकता. असे केल्याने तुम्हाला प्रथिनांसाठी चिकनचे अधिक सेवन करावे लागणार नाही आणि शरीराला मुबलक प्रमाणात प्रथिनेही मिळत राहतील. प्रथिनांसाठी तुम्ही टोफू, बीन्स, नट्स, दुग्धजन्य पदार्थ, अंडी आणि माशांचा आपल्या आहारात समावेश करू शकता.