Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ख्रिसमसला गोव्यासारखा अनुभव देतील भारतातील ही 5 ठिकाणं, कमी पैशात इथे घेता येईल सणाचा आनंद

Christmas 2025 : ख्रिसमसच्या उत्सवी वातावरणाचा गोव्यापेक्षा वेगळा अनुभव घ्यायचा असेल, तर भारतातील प्रमुख पाच ठिकाणं सुंदर निसर्ग, संस्कृती आणि साजरीकरणाचा अनोखा आनंद देतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 09, 2025 | 08:39 AM
ख्रिसमसला गोव्यासारखा अनुभव देतील भारतातील ही 5 ठिकाणं, कमी पैशात इथे घेता येईल सणाचा आनंद

ख्रिसमसला गोव्यासारखा अनुभव देतील भारतातील ही 5 ठिकाणं, कमी पैशात इथे घेता येईल सणाचा आनंद

Follow Us
Close
Follow Us:
  • ख्रिसमस हा सण दरवर्षी २५ डिसेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो
  • सणाची मजा घेण्यासाठी भारतातील काही स्पॉट पेटफेक्ट ठरतात
  • कुटुंबासोबत तुम्ही तुमची ट्रिप प्लॅन करू शकता
दरवर्षी 25 डिसेंबरला जगभरात मोठ्या उत्साहात क्रिसमस साजरा केला जातो. ईसा मसीह यांच्या जन्मदिनाची ही आनंदयात्रा धार्मिकतेसह सांस्कृतिक रंगांनी भरलेली असते. चर्चमधील प्रार्थना, घरांची सजावट, चमचमणारे क्रिसमस ट्री आणि कुटुंबासमवेत घालवलेला वेळ… या सगळ्यांतून ख्रिसमसची उत्सवी झिंग अनुभवता येते.भारतामध्ये ख्रिसमस म्हटलं की गोव्याचं नाव अगदी पहिल्यांदा येतं. तिथलं उत्साही वातावरण आणि रात्री उशिरापर्यंत चालणारे सेलिब्रेशन्स हा अनुभव खासच असतो. पण जर यंदा गोव्याच्या पलीकडे कुठे तरी ख्रिसमसचा आनंद घ्यायचा असेल आणि काहीतरी वेगळं पाहायचं असेल, तर भारतातील ही पाच ठिकाणं अगदी परफेक्ट पर्याय ठरू शकतात.

लोकांमध्ये वाढतोय धार्मिक पर्यटनाचा ट्रेंड, या तीर्थक्षेत्राला अधिक मागणी; टूर ऑपरेटरचे नवीन पॅकेज लाँच

१. शिलॉन्ग, मेघालय 

पूर्वोत्तर भारतातील हे मोहक शहर डिसेंबरमध्ये अक्षरशः गुलाबी रंगात न्हाऊन निघतं. चर्चमधून येणाऱ्या मधुर कॅरल्स, रस्त्यांवरील लखलखाट आणि लोकांची एकमेकांना शुभेच्छा देण्याची धांदल… सगळं शहर उत्सवी रूप घेतं. येथे स्थानिक हस्तकला, खास स्मृतिचिन्हे आणि रंगीबेरंगी बाजार फिरताना क्रिसमसचा माहोल अधिकच खुलतो. भारताची रॉक कॅपिटल म्हणून ओळख असलेलं हे शहर त्या काळात एक सुंदर क्रिसमस व्हिलेज बनून जातं.

२. पुदुचेरी 

ख्रिसमसची कल्पना जर तुमच्या मनात मोमबत्त्यांच्या उजेडात न्हालेल्या रस्त्यांशी, समुद्राच्या लाटांच्या आवाजाशी आणि कॉफी–क्रोइसानच्या सुगंधाशी जोडली असेल, तर पुदुचेरी तुमच्यासाठीच आहे. फ्रेंच क्वार्टरमधील पिवळ्या–पांढऱ्या इमारती, सजवलेले चर्च आणि शांत समुद्रकिनारा यामुळे क्रिसमस येथे अतिशय रोमँटिक आणि युरोपसारखा अनुभव मिळतो.

३. मनाली, हिमाचल प्रदेश 

हिवाळ्यात मनाली म्हणजे एक परिपूर्ण ‘स्नो वंडरलँड’. बर्फाच्छादित पर्वत, पाइनच्या झाडांवरील दिव्यांची झगमग, आणि हातात गरम चॉकलेट यामुळे मनालीतील क्रिसमस अगदी चित्रपटातील दृश्यांसारखाच भासतो. सोलंग व्हॅलीतील स्कीइंग, स्नोबोर्डिंग तसेच ओल्ड मनालीतील उबदार कॅफेमध्ये बसून बाहेर पडणाऱ्या धुक्याचा आनंद—हे सर्व मिळून हा उत्सव अविस्मरणीय बनतो.

४. शिमला 

शिमलामध्ये ख्रिसमस म्हणजे रिजवरील उजळलेले दिवे, मॉल रोडवरील गर्दी, आणि ठंडगार हवेत मिसळलेली उत्सवी धडपड. ब्रिटिशकालीन वास्तूंच्या नटलेल्या पार्श्वभूमीवर साजरा होणारा हा सण शहराला एक वेगळंच रूप देतो. विंटर कार्निव्हल, बर्फवृष्टी आणि ख्रिसमस डेकोरेशन यांमुळे शिमला हा भारतातील सर्वात आकर्षक क्रिसमस डेस्टिनेशनपैकी एक मानला जातो.

डेस्टिनेशन वेडिंग सोडा आता सुरू आहे ‘डीवाईन वेडिंग’चा ट्रेंड, भारतातील प्राचीन मंदिरं तुमच्या विवाहसोहळ्याची शान वाढवतील

५. केरल 

जर तुमच्या कल्पनेत क्रिसमससोबत नारळाच्या झाडांची सळसळ, लालटणांनी उजळलेले चर्च आणि मसाल्यांचा दरवळलेला सुगंध असेल, तर केरलची सफर तुमच्यासाठीच आहे. येथे क्रिसमस अत्यंत आध्यात्मिक धाटणीने साजरा होतो. शहरातील छोट्या गल्ली–रस्त्यांपासून ते मोठ्या कॅथेड्रलपर्यंत सर्वत्र दिव्यांचा प्रकाश आणि शांत वातावरण एक सुंदर अनुभव देतात. या वर्षी गोवापेक्षा काही वेगळं अनुभवायचं असेल, तर या पाच ठिकाणी क्रिसमसची जादू तुम्हाला नक्कीच भुरळ घालेल.

Web Title: Christmas 2025 best place to visit in india travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 08:39 AM

Topics:  

  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

डेस्टिनेशन वेडिंग सोडा आता सुरू आहे ‘डीवाईन वेडिंग’चा ट्रेंड, भारतातील प्राचीन मंदिरं तुमच्या विवाहसोहळ्याची शान वाढवतील
1

डेस्टिनेशन वेडिंग सोडा आता सुरू आहे ‘डीवाईन वेडिंग’चा ट्रेंड, भारतातील प्राचीन मंदिरं तुमच्या विवाहसोहळ्याची शान वाढवतील

Hidden Gems Of Mumbai : गर्दीपासून दूर मुंबईजवळ लपलेली सुंदर ठिकाणे, विकेंडला नक्की फिरून या 
2

Hidden Gems Of Mumbai : गर्दीपासून दूर मुंबईजवळ लपलेली सुंदर ठिकाणे, विकेंडला नक्की फिरून या 

लोकांमध्ये वाढतोय धार्मिक पर्यटनाचा ट्रेंड, या तीर्थक्षेत्राला अधिक मागणी; टूर ऑपरेटरचे नवीन पॅकेज लाँच
3

लोकांमध्ये वाढतोय धार्मिक पर्यटनाचा ट्रेंड, या तीर्थक्षेत्राला अधिक मागणी; टूर ऑपरेटरचे नवीन पॅकेज लाँच

‘व्हाइट मार्बल सिटी’ च्या नावाने ओळखलं जातं हे शहर, बिल्डिंगपासून गाड्यांपर्यंत इथे सर्वांचाच रंग दिसेल पांढरा
4

‘व्हाइट मार्बल सिटी’ च्या नावाने ओळखलं जातं हे शहर, बिल्डिंगपासून गाड्यांपर्यंत इथे सर्वांचाच रंग दिसेल पांढरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.