(फोटो सौजन्य – Pinterest)
आंध्र प्रदेश
भव्यतेने नटलेली दक्षिण भारतीय देवस्थाने… दक्षिण भारतातील तिरुमाला-तिरुपती येथील गोविंदराजा स्वामी कल्याण मंडपम येथे विवाह अत्यंत शुभ मानला जातो. तसेच श्रीकालहस्ती मंदिर, सिंहाचलम मंदिर आणि विजयवाडा येथील कनकदुर्गा मंदिर हे त्यांच्या धार्मिक उर्जेमुळे वेडिंग डेस्टिनेशन म्हणून विशेष ओळखले जातात.
आसाम
निसर्ग आणि अध्यात्माचा अनोखा मिलाफ. असममधील कामाख्या देवी शक्तीपीठ हे विवाहासाठी अत्यंत पवित्र मानले जाते. ब्रह्मपुत्रेच्या मध्यभागी वसलेले उमानंदा मंदिर हे शांत, अनोखे आणि अविस्मरणीय वेडिंग लोकेशन आहे. तसेच हयग्रीव माधव मंदिर आणि शिवडोल हेही सुंदर आणि मनःशांती देणारे स्थळे आहेत.
महाराष्ट्र आणि गुजरात
परंपरा आणि संस्कृतीचे मजबूत आधारस्तंभ असलेल्या महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर (नाशिक), भीमाशंकर, गणपतिपुळे, जेजुरी खंडोबा, तसेच कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर विवाहासाठी पवित्र आणि लोकप्रिय आहेत. गुजरातमध्ये सोमनाथ, द्वारकाधीश, अंबाजी आणि भव्य वास्तुकलेसाठी प्रसिद्ध मोढेरा सूर्य मंदिर हे शांत, पौराणिक आणि वेगळा अनुभव देणारे वेडिंग स्पॉट आहेत.
पंजाब आणि राजस्थान
राजेशाही सौंदर्य आणि अध्यात्म दोन्हींची जोड पंजाबमध्ये अमृतसरचे दुर्गियाना मंदिर, अनेक ISKCON मंदिरे, श्री देवी तालाब मंदिर, श्री राम तीर्थ, तसेच पटियाला काली माता मंदिर लोकप्रिय आहेत. राजस्थानमध्ये जयपूरचे बिरला मंदिर, पुष्करचे ब्रह्मा मंदिर, उदयपुरचे एकलिंगजी, बीकानेरचे करणी माता मंदिर आणि अनेक प्राचीन अंबिका माता मंदिर टेंपल वेडिंगसाठी उत्तम मानले जातात.
Hidden Gems Of Mumbai : गर्दीपासून दूर मुंबईजवळ लपलेली सुंदर ठिकाणे, विकेंडला नक्की फिरून या
कर्नाटक आणि ओडिशा
निसर्गरम्य परिसरातील दैवी स्थळे कर्नाटकात अनुभवायला मिळतील. कर्नाटकातील मुरुदेश्वर, उडुपी श्रीकृष्ण मंदिर, धर्मस्थळ, शांत समुद्रकिनाऱ्यांमधील गोकर्णा, तसेच श्रृंगेरी विद्याशंकर मंदिर हे दैवी वातावरणामुळे लग्नासाठी आकर्षक पर्याय आहेत. ओडिशातील लिंगराज मंदिर, पुरी श्रीजगन्नाथ मंदिर, आणि भव्यतेचे प्रतीक कोनार्क सूर्य मंदिर (प्रतिनिधिक विधींसाठी) हीही उत्तम धार्मिक ठिकाणे आहेत.
उत्तराखंड आणि हिमाचल
दिव्यता आणि निसर्गाचा सुंदर संगम. उत्तराखंडला ‘देवभूमी’ म्हणून ओळखले जाते. येथील त्रियुगीनारायण मंदिर (रुद्रप्रयाग) हे सर्वात खास मानले जाते, कारण पुराणकथेनुसार येथेच भगवान शिव-पार्वतीचा विवाह झाला होता. त्यामुळे येथे विवाह करणे म्हणजे दैवी आशीर्वाद प्राप्त केल्यासारखे मानले जाते. याशिवाय केदारनाथ, बद्रीनाथ, तसेच शांत वनराईत वसलेले जागेश्वर धाम, नीलकंठ महादेव (ऋषिकेश), दक्षिणेश्वर महादेव (हरिद्वार) आणि कल्पेश्वर (चमोली) हेही टेंपल वेडिंगसाठी उत्तम ठिकाणे आहेत. हिमाचल प्रदेशात ज्वाला देवी, चिंतपूर्णी, नैना देवी आणि मनालीतील प्रसिद्ध हिडिंबा देवी मंदिर लग्नासाठी लोकप्रिय पर्याय आहेत.
जर तुमच्या स्वप्नातील विवाहात शांतता, अध्यात्म, संस्कृती आणि पवित्रतेचा संगम हवा असेल, तर भारतातील ही मंदिरं तुमच्या वेडिंगला अनोखी आणि आयुष्यभर लक्षात राहील अशी दिव्यता देऊ शकतात.






