ब्लॅक कॉफी कोणत्या वेळी पिऊ नये (फोटो सौजन्य - iStock)
डार्क कॉफी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. काही लोक व्यायाम करण्यापूर्वी कॉफी पितात, असे मानले जाते की कॉफी पिल्याने शरीराला ऊर्जा मिळते. ज्या लोकांना रक्तदाब कमी असतो त्यांनाही कॉफी पिण्याचा सल्ला दिला जातो. इतकेच नाही तर फॅटी लिव्हरच्या रुग्णांनाही डार्क कॉफी पिण्याचा सल्ला दिला जातो.
कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का की चुकीच्या वेळी कॉफी पिणे तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले नाही. अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की दुपारच्या जेवणानंतर कॉफी पिणे मेंदूच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock)
कॉफी पिणे मेंदूच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे का?
कॉफी पिण्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, परंतु जर तुम्ही दुपारच्या जेवणानंतर कॉफी पित असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक असू शकते. काही लोकांना दुपारी जेवण झाल्यानंतर कॉफी पिण्याची सवय असते. प्रत्यक्षात, एका अभ्यासात असे आढळून आले आहे की दुपारच्या जेवणानंतर कॉफी पिल्याने मेंदू रात्रीपर्यंत खूप सक्रिय राहू शकतो. कॅनेडियन अभ्यासानुसार, कॉफीमध्ये असलेले कॅफिन रात्रीच्या झोपेच्या पद्धतीत अडथळा आणते.
रिकाम्या पोटी कॉफी पिण्याची सवय असेल तर वेळीच थांबा! जाणून घ्या आरोग्याला होणारे तोटे
कॉफी पिण्याने मेंदूच्या या भागावर परिणाम होतो
मॉन्ट्रियल विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, कॉफीचा मज्जासंस्थेवरही वाईट परिणाम होतो. ४० लोकांवर एक अभ्यास करण्यात आला. एका दिवशी ४० लोकांना २०० मिलीग्राम कॅफिन देण्यात आले, तर दुसऱ्या रात्री त्यांना कोणत्याही प्रकारचे कॅफिन देण्यात आले नाही. त्याच वेळी, त्यांच्या झोपेची गुणवत्ता तपासण्यात आली.
अभ्यासातून असे दिसून आले की ज्या दिवशी लोकांनी कॅफिन घेतले, त्या रात्री त्यांच्या मेंदूच्या ‘नॉन-आरईएम’वर खूप परिणाम झाला. नॉन-आरईएममुळे झोपेदरम्यान शरीर शांत आणि आरामदायी होण्यास मदत होते. या काळात, श्वासोच्छवास, मेंदू आणि हृदयाची क्रिया मंदावते. या काळात शरीर ऊती आणि स्नायू दुरुस्त करते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. दुसरीकडे, दिवसा कॉफी पिणाऱ्या लोकांना रात्री गाढ झोप येत नाही. ज्यामुळे या सर्व कार्यांवर प्रतिकूल परिणाम होतो.
Coffee Side Effects: कॉफीचे सेवन ‘कोणासाठी’ धोकादायक? कधी आणि किती प्यावी कॉफी; काय सांगतो अभ्यास
लठ्ठपणा आणि मधुमेहासह आजार
कॅफिनचे सेवन केल्याने झोप येते पण ती उशिरा येते. कॅफिनमुळे पूर्ण झोप येत नाही. गाढ झोपेच्या कमतरतेमुळे मेंदूच्या क्रियाकलापांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. कमी झोपेमुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयाशी संबंधित आजार आणि वंध्यत्वाचा धोका वाढतो. त्यामुळे तुम्ही कोणत्या वेळी आणि किती कॉफी पित आहात हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.