सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी काहींना कॉफी पिण्याची सवय असते. कॉफी प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. पण रिकाम्या पोटी कॉफी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही? असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल ना. वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक सकाळी उठल्यानंतर कॉफीचे सेवन करतात. तसेच शरीरातील कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी कॉफी अतिशय प्रभावी आहे. पण सतत कॉफी प्यायल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कॉफी प्यायल्यामुळे आरोग्याचे काय नुकसान होते, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
कॉफी प्यायल्यामुळे आरोग्याला होणारे तोटे
रिकाम्या पोटी कॉफीचे सेवन केल्यामुळे पोटातील ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते. शिवाय ऍसिडिटी वाढल्यामुळे छातीत जळजळ, आम्ल्पित्त वाढण्याची शक्यता असते.
कॉफीचे सेवन केल्यामुळे लघवीचे प्रमाण वाढू लागते. शिवाय शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे डिहायड्रेशनची समस्या, डोकेदुखी, चक्कर इत्यादी समस्या वाढू लागतात.
रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये वाढ होते. कॉफीचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. ज्यामुळे थकवा, अशक्तपणा आणि चिडचिड वाढू लागते.
सतत कॉफीचे सेवन केल्यामुळे रात्रीच्या वेळी झोप लागत नाही. तसेच झोपेची गुणवत्ता पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे अतिप्रमाणात कॉफीचे सेवन करू नये.
रात्री झोपण्याआधी कॉफीचे सेवन करू नये. अतिप्रमाणात कॉफीचे सेवन केल्यामुळे शरीरात अनेक नकारात्मक बदल दिसून येतात.