
सर्दी खोकल्यामुळे हैराण झाला आहात! मग चमचाभर मधात मिक्स करा 'हा' शक्तिशाली पदार्थ, कफ होईल कायमचा गायब
सर्दी खोकला होण्याची कारणे?
मध खाण्याचे फायदे?
मधाचे चाटण बनवण्याची कृती?
राज्यासह संपूर्ण देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला कायमच दिला जातो. हिवाळ्यात साथीच्या आजारांमध्ये झपाट्याने वाढ होते. साथीच्या आजारांकडे कायमच दुर्लक्ष केल्यास हेच आजार शरीरासाठी जीवघेणे ठरतात. याशिवाय सर्दी-खोकला, घसा बसणे आणि छातीत कफ साचणे इत्यादी अनेक आरोग्यासंबंधित समस्या वाढू लागतात. छातीमध्ये जमा झालेल्या कफमुळे श्वास घ्यायला त्रास होतो. सतत येणाऱ्या खोकल्यामुळे छातीमध्ये जडपणा जाणवणे, छातीत वेदना होणे, डोकेदुखी इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. थंडीच्या दिवसांमध्ये उद्भवणाऱ्या आजारांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. छातीमध्ये जमा झालेल्या कफमुळे श्वास घेताना अडचण निर्माण होते, ज्याचा परिणाम दैनंदिन कामावर लगेच दिसून येतो. त्यामुळे सर्दी खोकला झाल्यानंतर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला छातीमध्ये जमा झालेला कफ पातळ करण्यासाठी मधात कोणता पदार्थ मिक्स करून चाटण बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
प्रत्येक स्वयंपाक घरात मध असतेच. मधाचा वापर आयुर्वेदिक औषध म्हणून केला जातो. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरतात. खोकला झाल्यानंतर आयुर्वेदात मध खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. योग्य पद्धतीने मधाचे सेवन केल्यास तात्काळ फरक दिसून येईल आणि सर्दी खोकला कमी होईल. मधामध्ये हळद, मीठ आणि काळीमिरी पावडर मिक्स करून चाटण खाल्ल्यास खोकल्यापासून आराम मिळेल. यासाठी मोठ्या चमच्यामध्ये मध, चिमूटभर हळद, काळीमिरी पावडर घालून मिक्स करा. सर्दी खोकला झाल्यानंतर मधाचे चाटण खाल्ल्यास खोकला आणि सर्दी कमी होईल.
छातीमध्ये जमा झालेला कफ बाहेर काढण्यासाठी मध अतिशय प्रभावी ठरते. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. यामुळे छातीत जमा झालेला कफ पातळ होण्यास मदत होईल. मधाचे चाटण खाल्ल्यामुळे घशाची सूज कमी होते आणि खवखवण्यापासून आराम मिळतो. साथीच्या संसर्गापासून आराम मिळवण्यासाठी मधाचे चाटण खाऊन त्यावर कोमट पाणी प्यावे. हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट आहे, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. हळदीमध्ये दाहशामक, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, ज्यामुळे घशात वाढलेली सूज कमी होते, श्वसनमार्गाची सूज कमी होते आणि कफ सहजपणे बाहेर पडून जातो. मिठामुळे घशात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते .
मधाच्या मिश्रणात मीठ मिक्स करून खाल्ल्यास कफाला पातळ करून बाहेर काढून टाकण्याचे काम करते. मध, काळीमिरी पावडर आणि हळद एकत्र मिक्स करून चाटण बनवून खाल्ल्यास मुळांपासून कफ बाहेर पडून जाईल. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आणि सततच्या संसर्गामुळे शरीराला साथीच्या आजारांची लागण होते. व्हायरल इन्फेक्शनपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नियमित कोमट पाण्याचे सेवन करावे. मधामध्ये असलेल्या चिकटपणामुळे छातीत जमा झालेला कफ सहज बाहेर पडून जाईल.