
आंबवलेला भात खाल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या भात बनवण्याची कृती आणि शरीराला होणारे आश्चर्यकारक फायदे
आंबवलेला भात बनवण्याची कृती?
आंबवलेला भात खाण्याचे फायदे?
भात किती तास आंबवावा?
भारतीय जेवणात कायमच भात खाल्ला जातो. भात नसेल तर जेवल्यासारखे अजिबात वाटत नाही. भात खाल्ल्यामुळे केवळ पोट भरत नाहीतर शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत भात हा पदार्थ भारतीय आहारातील मुख्य पदार्थ आहे. देशाच्या विविध भागात भाताचे नाव वेगवेगळे आहे. अनेक ठिकाणी बंगालमधील पोइला भात, केरळमधील पझमकंजी, आसामचा पोइता भात, ओडिशाचा गिल भात आणि आंध्र प्रदेशातील चड्डानम अशी अनेक वेगवेगळी नावे आहेत. भात हा केवळ पारंपरिक पदार्थ नसून आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा पदार्थ आहे. सगळ्यांचं पांढरा भात खायला खूप जास्त आवडतो. पण आहारात कायमच पांढरा भात खाण्याऐवजी कधीतरी आंबवलेल्या भाताचे सुद्धा आहारात सेवन करावे. आंबवलेला भात शरीरात प्रीबायोटिकसारखे काम करतो. चला तर जाणून घेऊया आंबवलेला भात बनवण्याची सोपी पद्धत आणि शरीराला होणारे फायदे.(फोटो सौजन्य – istock)
पांढऱ्या भातापासून आंबवलेला भात बनवला जातो. यासाठी आधल्या दिवशी भात शिजवला जातो. त्यानंतर रात्री मातीच्या भांड्यात भात हलक्या हाताने मोकळा करून भात पूर्णपणे बुडेल एवढे पाणी टाकले जाते. त्यानंतरव त्यावर झाकण मारून रात्रभर ठेवले जाते. दुसऱ्या दिवशी भाताची चव हलकीशी आंबट लागते. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून भात मॅश केला जातो. तयार केलेल्या भातामध्ये ताक किंवा दही घालून मिक्स केले जाते. आंबवून तयार केलेला भात सकाळच्या नाश्त्यात खाल्ला जातो.
भात आंबवण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्यात अनेक पोषक घटक तयार होतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटीमायक्रोबियल तत्व, व्हिाटामिन E, फिनॉलिक घटक, फ्लेव्होनॉइड्स, लिनोलिक अॅसिड आणि अँथोसायनिन यांसारखे अनेक घटक आढळून येतात. आंबवलेला भात खाल्ल्यास आतड्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासोबतच पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आंबवलेला भात खावा. वारंवार जुलाब होत असल्यास कोणत्याही जड पदार्थांचे सेवन करण्याऐवजी आंबवलेला भात खावा.
आंबवलेल्या भातामुळे कॅल्शियम, आयर्न आणि मॅग्नेशियमसारख्या खनिजांची उपलब्धता वाढते. १२ तासांपर्यंत भात आंबवल्यास त्यातील आयर्नचे प्रमाण सामान्य शिजवलेल्या भाताच्या तुलनेत तब्बल २१ पट वाढते, ज्यामुळे आंबवलेला भात शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक मानला जातो. नियमित आंबवलेला भात खाल्ल्यास शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. कमी झोप आणि शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी आंबवलेल्या भाताचे सेवन करावे. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.